Apple चा सर्वात मोठा सेल! आयफोन, मॅकबुकसह सगळ्या प्रॉडक्ट्सवर १० हजारांपर्यंतची सूट; आत्ताच खरेदी करा!

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनने सेलच्या माध्यमातून विविध ऑफर दिल्या आहेत आणि आता अ‍ॅपलनेही फेस्टिव्ह सीझन सेलची घोषणा केली आहे.
Apple Sale
Apple Saleesakal

Apple Sale : सणानिमित्त फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनने सेलच्या माध्यमातून विविध ऑफर दिल्या आहेत आणि आता अ‍ॅपलनेही फेस्टिव्ह सीझन सेलची घोषणा केली आहे. सेल अंतर्गत, ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरात आयफोन, आयपॅड, घड्याळ खरेदी करता येणार आहेत. सेलमध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ घेता येईल. या सणासुदीच्या हंगामात अ‍ॅपलच्या कोणत्या ऑफरचा लाभ घेता येईल, जाणून घ्या.

Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ६,००० रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात. iPhone 15 Pro मॉडेल्सची किंमत अनुक्रमे १.३४ लाख आणि १.५ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. पण जर तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला ६,००० रुपयांची सूट दिली जाईल.

iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर ५००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तुम्हाला आयफोन १५ साठी लाखो रुपये खर्च करायचे नसतील, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम डील आहे. iPhone 15 मॉडेलची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होत आहे.

Apple Sale
Amazon Sale : ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ला मोठा प्रतिसाद; पहिल्या एका तासात सेकंदाला ७५ स्मार्टफोन्सची विक्री!

iPhone 14 आणि iPhone 14 Plus ४,००० रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. जर तुम्हाला अ‍ॅपलचे पूर्वीचे मॉडेल्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही iPhone 14 आणि iPhone 14 Plus ४००० रुपयांपेक्षा अधिक सूट मिळवून खरेदी करू शकता.

सणासुदीच्या निमित्ताने  ३००० रुपयांच्या सवलतीत iPhone 13 खरेदी करता येईल. तर या सेलमध्ये iPhone SE वर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. आता MacBook बद्दल बोलायचं झालं तर, अ‍ॅपलच्या सेलमध्ये ग्राहक १०,००० रुपयांच्या सवलतीत MacBook Air (M2 Chip) १३ इंच आणि १५ इंच खरेदी करू शकतात. हे दोन्ही मॅकबुक खूपच आकर्षक आहेत आणि दोन्हीमध्ये M2 चिप आहे.

MacBook Pro १३ इंच, १४ इंच आणि १६ इंच लॅपटॉप देखील १०,००० रुपयांच्या सवलतीत खरेदी केले जाऊ शकतात. दुसरीकडे, ग्राहकांना M1 चिपसह MacBook Air वर ८,००० रुपयांची सूट दिली जात आहे.

Apple Sale
Apple Event 2023 : नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच, नवी ओएस.. अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये काय काय झालं लाँच? जाणून घ्या

अ‍ॅपलचा मॅक स्टुडिओ क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांसाठी आहे, आणि तो त्याच्या मूळ किमतीपेक्षा १०,००० रुपयांनी स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. iPad Pro च्या ११-इंच आणि १२.९-इंच मॉडेल्सवर ५,००० रुपयांची सूट दिली जात आहे. अ‍ॅपल वॉच अल्ट्रा २ वर सेल अंतर्गत ५००० रुपयांची सूट दिली जात आहे. Apple Watch Series 9 ४००० रुपयांच्या सूटसह स्वस्त दरात सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com