Foldable iPhone : आता Apple खिशात फोल्ड करून ठेवता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foldable iPhone : आता Apple खिशात फोल्ड करून ठेवता येणार

Foldable iPhone : आता Apple खिशात फोल्ड करून ठेवता येणार

Foldable iPhone : दिवसेंदिवस आयफोन विकत घेणाऱ्यांची संख्या वाढत असून, कंपनीकडूनही यूजर्ससाठी नव-नवीन फिचर असलेले फोन लाँच करत असते. त्यात काही दिवसांपासून मार्केटमध्ये पुन्हा फोल्डेबल फोनची क्रेज सुरू झाली आहे.

सध्या बाजारात सॅमसंग आणि मोटोरोलोचे फोल्डेबल फोन उपलब्ध असून, अनेक दिवसांपासून फोल्डेबल आयफोनची वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. कारण, आता अप्पलने सॅमसंग आणि मोटोरोला टक्कर देण्यासाठी फोल्डेबल फोन लाँच केला आहे. अॅपलकडून लाँच करण्यात आलेला हा फोन कस्टम मेड अॅपल फोल्डेबल फोन असून, सध्या हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन चीनमधील काही इंजीनिअर्सने बनवला असल्याचे सांगितले जात आहे.

फोल्डेबल आयफोनची खास फीचर्स काय?

फोल्डेबल आयफोन आयफोन १३ चे सुटे भाग एकत्र करून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये आयफोन १३ चे फीचर्स देण्यात आले आहेत असे म्हणता येऊ शकेल. फोल्डेबल आयफोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यात 1000mAh बॅटरी असून, फोनमधील एक स्पीकर काढून टाकण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, वायरलेस चार्जिंग आणि मॅगसेफ कंपोनंट काढून टाकण्यात आले आहेत. या फोनमध्ये सर्वाधित फीचर्स iPhone 13 चे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या फोल्डेबल आयफोनचे कस्टम मेड मॉडेल आहे. त्यामुळे हे मॉडेल बाजारात कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल याची सध्या हा बाजारात विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

टॅग्स :apple mobileApple iphone