Apple वापरकर्त्यांना धक्का! कंपनीने वाढवल्या AirPods च्या किमती

apple increases airpods prices by up to rs 6200 after customs duty hike
apple increases airpods prices by up to rs 6200 after customs duty hike

Apple चाहत्यांना आता भारतात त्यांचे आवडते हेडफोन्स खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण कंपनीने देशातील एअरपॉड (AirPods) रेंजच्या किमती वाढवल्या आहेत. Apple देशात AirPods 2nd Generation, AirPods 3rd Generation, AirPods Pro आणि AirPods Max हे प्रॉडक्ट विकते. कंपनीने त्यांच्या किमती 10% पर्यंत वाढवल्या आहेत. चला तर मग सर्व App एअरपॉड्सच्या नवीन किमती जाणून घेऊया..

भाव का वाढले?

किमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये प्रस्तावित कस्टम ड्यूटी हे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कस्टम ड्युटी 10% वरून 22% पर्यंत वाढवली होती, ज्याचा परिणाम आता AirPods च्या किमतींवर जाणवत आहे.

एअरपॉड्सच्या नवीन किमती काय आहेत?

अॅपल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर वाढलेल्या किमती पाहता येतील. सर्व ऑडिओ डिव्हाइसेसमध्ये AirPods Max च्या किंमतीत सर्वाधिक 6,200 रुपयांची वाढ झाली आहे. हेडफोनची किंमत आता 66,100 रुपयांवर गेली आहे. नव्याने लाँच झालेल्या थर्ड जनरेशन एअरपॉड्सची किंमत आता 18,500 रुपयांच्या लाँच किमतीच्या तुलनेत 20,500 रुपये आहे. AirPods Pro आता 26,300 रुपयांच्या वाढीव किमतीत उपलब्ध आहे. AirPods Pro ची किंमत 24,900 रुपये होती. मागील जनरेशनच्या AirPods च्या किंमतीत देखील 5% वाढ झाली आहे आणि आता त्यांची किंमत 14,100 रुपये इतकी आहे.

apple increases airpods prices by up to rs 6200 after customs duty hike
ED कारवाईनंतर राऊतांना उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा फोन

दरम्यान जरी वर नमूद केलेल्या किंमती Apple India च्या अधिकृत वेबसाइटवरून घेतल्या गेल्या आहेत, तरीही AirPods Amazon, Flipkart, Croma, Reliance Digital आणि इतर स्टोअरवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. एअरपॉड्स व्यतिरिक्त भारतात अॅपलचे दुसरे कोणतेही उत्पादन महाग झालेले नाही. तसेच या दरवाढीबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

apple increases airpods prices by up to rs 6200 after customs duty hike
मस्कची ट्विटरमध्ये एंट्री; CEO पराग अग्रवाल अन् जॅक डोर्सी म्हणतात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com