अ‍ॅपल iPhone 13, iPhone 13 Pro, iPad mini भारतात लॉंच

Apple Event 2021
Apple Event 2021Google

Apple Event iPhone 13 LIVE UPDATES : अ‍ॅपल कंपनीच्या चहात्यांसाठी आजचा दिवस खास ठरला. Apple कंपनीने आज झालेल्या व्हर्चुअल इव्हेंटमध्ये iPhone 13 सीरीजसह ipad, iPad mini, iPhone 13 Pro, Pro Max, iPhone 13, iPhone 13 mini, Apple Watch Series 7 इत्यादी प्रोडक्ट लॉन्च केले.

Apple iPhone 13, iPhone 13 mini

आयफोन 13 ला नवीन लुक देण्यात आला असून याच्या मागच्या बाजूला देण्यात आलेले कॅमेरा तिरपे देण्यात आले आहेत. या आयफोनसाठी गुलाबी रंगाचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

डिस्प्लेमध्ये 1200 एनआयटी ब्राइटनेस तसेच डिस्प्ले आकार आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीसाठी अनुक्रमे 6.1-इंच आणि 5.4-इंच आहेत. Apple iPhone 13 हा A15 Bionic चिपसेटवर चालेल. यात 6-कोर CPU देण्यात आला आहे ज्यामध्ये 2 हाय परफॉर्मंस कोर आणि 4 इफीशियंसी कोर दिल्या आहेत. तसेच हा पोन 4-कोर GPU सह येईल येते. यात मशीन लर्निंग साठी 16-कोर न्यूरल इंजिन आहे.

ipad ची किंमत काय असेल?

आयपॅड आजपासून Apple.com/store वर आणि अमेरिकेसह 28 देशांमध्ये Apple Store अ‍ॅपवर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहे. आयपॅडचे वाय-फाय मॉडेल 30,900 रुपयांपासून आणि वाय-फाय + सेल्युलर मॉडेल 42,900 रुपयांपासून सुरु होईल IPad साठी स्मार्ट कीबोर्ड 13,900 रुपयांना स्वतंत्रपणे खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयपॅडसाठी स्मार्ट कव्हर ब्लॅक, व्हाईट आणि इंग्लिश लव्हेंडरमध्ये 3,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

कॅमेरा

अ‍ॅपल आयपॅड मिनीमध्ये आता बॅक कॅमेरा 12 एमपीचा देण्यात आला असून जो 4K मध्ये रेकॉर्ड करु शकणार आहेत. तर फ्रंटला आयपॅडला 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तसेच स्टीरिओसह नवीन स्पीकर सिस्टम देखील देण्यात आली आहे. स्मार्ट Folioचा एक नवीन सेट देण्यात येइल तसेच. हे सेकंड जनरेशन आयपॅड मिनीला देखील सपोर्ट करेल. IPad मिनीची किंमत $ 499 आहे आणि ती आज प्रीऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

iPad mini

iPad मिनी मध्ये 8.3 इंचाची टच स्क्रिन देण्यात आली असून वरच्या बटण म्हणून टच आयडीसह देण्यात आला आहे. मागील जनरेशनच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत सीपीयूच्या परफॉर्मन्स 40 टक्क्यांनी तर जीपीयूच्या कामगिरीमध्येही सुधारणा झाली आहे. iPad mini बे A13 बायोनिक चिपसेट वर चालेल. iPad मिनीमध्ये आता USB-C पोर्ट देण्यात आला आहे आपण आता हे आपल्या कॅमेरा, लॅपटॉप, इतर कोणत्याही डिव्हाइसशी सहज कनेक्ट करू शकता. तसेच हे 5G ला सपोर्ट करतो.

ipad 2021

Apple चे iPad 2021 नवीनतम A13 बायोनिक चिपसेट चालते. त्याच्या तळाशी एक बटण देण्यात आले आहे . आयपॅडमध्ये 112 डिग्री पॉंइट व्ह्यू सहा 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा सेंटर-स्टेज फोकस फीचर्ससह देण्यात आला आहे ज्यामुळे कॉल करणे अधिक सोपे होणार आहे करेल आणि इतर वापरकर्त्यांना ऑटोमॅटीकली शोध घेईल. हे फस्ट जनरेशन Apple पेन्सिलला सपोर्ट करेल.

Apple Watch सीरीज 7

या इव्हेंटमध्ये Apple Watch सीरीज 7 लॉंच होणार आहे. यामध्ये लहान बेजल्स आणि फ्लॅट-एज अशा दोन डिझाइनसह ही लाँच केले जाऊ शकते. तसेच, त्यात एक छोटी S7 चिप दिली जाईल, ज्यामुळे मोठ्या बॅटरीसाठी अधिक जागा मिळेल. हा चिपसेट तैवानच्या ASE तंत्रज्ञानाद्वारे बनवला जाईल. तसेच या मध्ये अनेक नवीन वॉच फेसेस पाहायला मिळू शकतात.

इव्हेंटमध्ये काय होणार लाँच?

आजच्या या इव्हेंटमध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे चार मॉडेल्स लॉंच केले जातील अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

हा इव्हेंट कुठे आणि कधी पाहता येईल?

भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता या इव्हेंटचे लाईव्ह प्रसारण केले जाईल. हा इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही Apple च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर याचे लाईव्ह पाहू शकता

किंमत किती असेल?

वेगवेगळ्या मिडीया रिपोर्टनुसार iPhone Pro Max ची किंमत ही जवळपास 1,099 डॉलर्स म्हणजेच 80,679 रुपये असू शकते, या फोन विक्री ही 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. तसेच हा स्मार्टफोन पांढरा, काळा आणि प्रॉडक्ट (रेड) कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. हा फोन गुलाबी रंगात देखील उपलब्ध होईल अशी देखील चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com