iPhone 14 Launch : सप्टेंबर महिन्यात होणार लॉंच, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

apple iphone 14 launch date tippe know when it will be launched

iPhone 14 Launch : सप्टेंबर महिन्यात होणार लॉंच, जाणून घ्या डिटेल्स

iPhone 14 Launch : प्रत्येक वेळी प्रमाणे याही वेळी Apple आपला नवीन iPhone 14 सप्टेंबरमध्ये लॉन्च करेल. याआधी आयफोन 14 लाँच होण्यास या वर्षी उशीर होऊ शकतो अशी माहिती समोर आली होती. पण आता नवीन रिपोर्टनुसार, कंपनी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच आपला इव्हेंट आयोजित करून iPhone 14 लॉन्च करेल. यासोबतच वॉच सीरीज 8 आणि इतर उत्पादनेही सादर केली जाणार आहेत.

iphone 14 कधी लाँच होईल

जुन्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी 13 सप्टेंबरला आपला इव्हेंट लॉन्च करणार होती. पण आता नवीन रिपोर्ट्सनुसार, कंपनी 7 सप्टेंबरला आपल्या इव्हेंटमध्ये iPhone 14 लॉन्च करेल. Apple ने अद्याप अधिकृतपणे iPhone 14 च्या लॉन्च तारीख कन्फर्म केलेली नाही.

आयफोन 14 मध्ये काय अपेक्षित आहे..

Apple कंपनी iPhone 14 चे चार मॉडेल लॉन्च करू शकते. यामध्ये iphone 14 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले, iphone 14 max मध्ये 6.7 इंच, iphone 14 pro मध्ये 6.1 इंच आणि iphone 14 pro max मध्ये 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तो 1170 x 2532 पिक्सेलचे रिझोल्यूशन मिळू शकते. आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 120 Hz चा रिफ्रेश रेट देखील आढळू शकतो. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की आयफोन 14 मॉडेलमध्ये काही बदल होण्याची अपेक्षा आहे, परंतु आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये अपडेटेड कॅमेरा टेक्नोलॉजीचा समावेश असेल. A16 बायोनिक चिप नवीन iPhones मध्ये आढळू शकते. यासह, 5.4-इंचाचा आयफोन मिनी यावेळी उपलब्ध होणार नाही.

याशिवाय कंपनी अॅपल वॉचच्या तीन मॉडेल्सवर काम करत आहे. यामध्ये नवीन Apple Watch Series 8, Apple Watch SE Watch तसेच त्याची नवीन Pro व्हर्जनटा समावेश असू शकतो.

टॅग्स :appleiphone