

iPhone 18e Leaks: A20 Chip, 24MP Camera & Key Specs Revealed
esakal
Apple iPhone 18e Leaks: ॲपल (Apple) प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. कंपनी आपल्या बजेट फ्रेंडली आयफोन सीरिजमधील पुढील मॉडेल म्हणजेच iPhone 18e वर वेगाने काम करत आहे. चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'वेइबो'वर प्रसिद्ध टिप्स्टर 'डिजिटल चॅट स्टेशन' (Digital Chat Station) ने या अपकमिंग स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
या नवीन लीक्सनुसार, ॲपलच्या या फोनमध्ये परफॉर्मन्स आणि सेल्फी कॅमेऱ्याच्या बाबतीत मोठा अपग्रेड पाहायला मिळणार आहे. पण, सध्याच्या अँड्रॉइड फोन्समध्ये सर्रास मिळणाऱ्या एका महत्त्वाच्या फीचरबाबत युजर्सची निराशा होण्याची शक्यता आहे.