अॅपल आयफोन चेहरा ही पहचान है; नवे आयफोन्स सादर

वृत्तसंस्था
Wednesday, 13 September 2017

आयफोनची वैशिष्ट्ये :

 • आयफोन X अनलॉक करण्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान
 • आयफोन 8 चा 4.7 इंच रेटिना एचडी डिस्प्ले
 • आयफोन 8 प्लसचा 5.5 इंच रेटिना एचडी डिस्प्ले
 • 8 कोअर प्रोसेसर, A 11 बायोनिक चीप
 • दोन्ही फोन्स पाणी आणि धुळीपासून बचाव करणारे
 • आयफोन 8 चा मागील कॅमेरा 12 मेगापिक्सल, फ्रंट 7 मेगापिक्सल
 • आयफोन 8 प्लसचा मागील व पुढील कॅमेरा 12 मेगापिक्सल
 • वायरलेस चार्जर
 • स्टेरिओ स्पिकर्स

क्युपर्टिनो : अॅपल कंपनीने पहिला आयफोन सादर केल्यानंतर आता दशकभराने कंपनीने पूर्णपणे नवी रचना असलेला आयफोन बाजारात आणला आहे. आयफोन 8, 8 प्लस आणि आयफोन एक्स असे हे नवे आयफोन कंपनीने मंगळवारी रात्री जाहीर केले. 

अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयफोन 8 आणि 8 प्लस या फोन्सचे सादरीकरण करण्यात आले. कंपनीने मागील दशकभरात 1.2 अब्जाहून अधिक आयफोनची विक्री केली असून, मोबाईलच्या जगतात क्रांतिकारी बदल केले आहेत. मात्र, गेल्या वर्षी आयफोन-7 ला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीच्या महसुलात घट झाली होती. आयफोन-6 प्रमाणेच आयफोन-7 असल्याने ग्राहकांच्या पसंतीस तो उतरला नव्हता. आता कंपनी अत्याधुनिक आयफोन 8 आणि आयफोन एक्स सादर केला आहे. या आयफोनची रचना आधीच्या आयफोनपेक्षा वेगळी असणार आहे. आयफोन 8 आणि 8 प्लस अनलॉक करण्यासाठी या आधीच्या आयफोन प्रमाणेच टच आयडी असणार आहे तर आयफोन एक्स अनलॉक करण्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे फिंगरप्रिंट सेन्सरची गरज यात असणार नाही. 

आयफोन 8 आणि 8 प्लस या आयफोन्सचे सादरीकरण भारतात 22 सप्टेंबरला होणार आहे. आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163) पासून सुरु होईल. आयफोन 8 च्या मेमरीची क्षमता 64 जीबी असणार आहे. तर, 8 प्लसची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या मोबाईल्सच्या मेमरीची क्षमता 256 जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. गेल्यावर्षी सादर केलेल्या आयफोन 7 ची क्षमत 32 जीबी इतकीच होती. यामध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या असून, यात वायरलेस चार्जिंगचा समावेश आहे. ऍपल वॉच आणि ऍपल टीव्ही यांची अत्याधुनिक श्रेणीही कंपनी लवकरच सादर करणार आहे. आयफोन 8 आणि 8 प्लसचे बुकींग 15 सप्टेंबरपासून सुरु होणार असून, आयफोन एक्सचे बुकींग 28 ऑक्टोंबरपासून सुरु होईल.

आयफोनची वैशिष्ट्ये :

 • आयफोन X अनलॉक करण्यासाठी फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान
 • आयफोन 8 चा 4.7 इंच रेटिना एचडी डिस्प्ले
 • आयफोन 8 प्लसचा 5.5 इंच रेटिना एचडी डिस्प्ले
 • 8 कोअर प्रोसेसर, A 11 बायोनिक चीप
 • दोन्ही फोन्स पाणी आणि धुळीपासून बचाव करणारे
 • आयफोन 8 चा मागील कॅमेरा 12 मेगापिक्सल, फ्रंट 7 मेगापिक्सल
 • आयफोन 8 प्लसचा मागील व पुढील कॅमेरा 12 मेगापिक्सल
 • वायरलेस चार्जर
 • स्टेरिओ स्पिकर्स
 • सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात उपलब्ध

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple iPhone 8, iPhone 8 Plus India launch on September 29, price starts at Rs 64,000