Apple iPhone Export Growth From India
esakal
नवी दिल्ली : भारतातून होणारी ॲपल कंपनीच्या आयफोनची निर्यात डिसेंबर २०२५ अखेर ५० अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचली (Apple iPhone Export Growth From India) आहे. भारतातील आपल्या कंत्राटी उत्पादकांद्वारे, सरकारच्या स्मार्टफोन उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) कंपनीने निर्यातीचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.