हेच ऐकायचे होते बाकी! अॅपलनं आणली पाण्याची बाटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apple Water Bottle

हेच ऐकायचे होते बाकी! अॅपलनं आणली पाण्याची बाटली

Apple Water Bottle : महागड्या आयफोनसाठी (i-Phone) प्रसिद्ध असलेल्या Apple ने आता पाण्याची बाटली लॉन्च केली आहे, ज्याची किंमत भारतात सुमारे 4,600 असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडेच, कंपनीने सुमारे 1,900 किंमतीचे पॉलिशिंग कापड लाँच केले होते त्यानंतर आता कंपनीने अमेरिकन कंपनीच्या मदतीने Hidrate Spark नावाची पाण्याची बाटली लॉन्च केली आहे. (Apple Launched Water Bottle)

पाण्याच्या बाटलीत खास काय

HidrateSpark पाण्याची बाटली Apple च्या वेबसाइटवर आणि किरकोळ स्टोअरवर 59.95 डॉलर म्हणजेच अंदाजे 4,600 रुपयांमध्ये उपलब्ध असून, ही बाटली सध्या फक्त यूएस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

बाटली इतकी महाग का?

ही एक स्मार्ट पाण्याची बाटली असून, तुमच्या दैनंदिन पाणी किंवा द्रवपदार्थांच्या सेवनावर याद्वारे लक्ष ठेवता येऊ शकते. एवढेच नव्हे तर, ही बाटली तुम्ही तुमच्या Apple Health शी सिंक करू शकता.

बाटली दोन प्रकारात उपलब्ध

iPhones प्रमाणे, HidrateSpark देखील दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे यामध्ये HidrateSpark Pro आणि HidrateSpark Pro STEEL असे दोन प्रकार आहे. याची किंमत अनुक्रमे 59.95 डॉलर म्हणजे अंदाजे 4,600 रुपये आणि 79.95 डॉलर म्हणजेच अंदाजे 6,100 रुपये इतकी आहे.

HidrateSpark Pro STEEL दोन रंगांमध्ये उपलब्ध

HidrateSpark Pro STEEL बाटली सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगामध्ये उपलब्द असून, या बाटलीच्या तळाशी एक एलईडी सेन्सर लावण्यात आले आहे. जो पाण्याचे सेवन किती प्रमाणात केले जात आहे हे ओळखून ब्लूटूथ कनेक्शनद्वारे Apple हेल्थला अलर्ट करण्याचे काम करतो. तर, HidrateSpark Pro ही बाटली काळ्या आणि हिरव्या रंगात आणि तत्सम वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.