esakal | Apple चे नवीन iPad आणि iPad mini लॉन्च; पाहा किंमत आणि फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

ipad iPad mini

Apple चे नवीन iPad आणि iPad mini लॉन्च; पाहा किंमत आणि फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Apple ने 2021 लॉंच इव्हेंटमध्ये आयपॅडची लेटेस्ट आवृत्ती लॉंच केली. या नव्या आयपॅड मध्ये ग्राहकांना ए 13 चिपसेट देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचा दावा आहे की, इतर कोणत्याही Android टॅब्लेटपेक्षा हा iPad फास्ट असेल.

iPad मध्ये देण्यात आलेल्या A13 प्रोसेसरसह हा टॅबलेट गेमिंग, क्रिएटीव्हीटी आणि इतर गोष्टींसाठी बेस्ट ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. या प्रोसेसरमुळे दोन्ही कॅमेऱ्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला होईल. Apple ने नवीन आयपॅडवर आयपॅड प्रोचा कॅमेरा दिला आहे, त्यामुळे आयपॅडला आता 12 एमपी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये सेंटर स्टोज फीचर देखील देण्यात आले आहे. iPad वर व्हिडिओ कॉल करणे आणखी सोपे होईल. कंपनीने लेटेस्ट आयपॅडमध्ये ट्रूटोन फीचर देखील दिले आहे. हा आयपॅड फस्ट जनरेशन Apple पेन्सिलला देखील सपोर्ट करेल.

हा नवीन आयपॅड आजपासून Apple.com/store वर आणि अमेरिकेसह 28 देशांमध्ये Apple Store अॅपवर ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहे. आयपॅडचे वाय-फाय मॉडेल 30,900 रुपयांपासून आणि वाय-फाय + सेल्युलर मॉडेल 42,900 रुपयांपासून सुरु होईल IPad साठी स्मार्ट कीबोर्ड 13,900 रुपयांना स्वतंत्रपणे खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयपॅडसाठी स्मार्ट कव्हर ब्लॅक, व्हाईट आणि इंग्लिश लव्हेंडरमध्ये 3,500 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

iPad mini

Apple कंपनीने त्यांच्या इव्हेंटमध्ये आयपॅड सह नवीन आयपॅड मिनी लाँच केला आहे. पहिल्यांदाच आयपॅड मिनीच्या स्क्रिनचा आकार वाढवण्यात आला आहे. नवीन आयपॅड मिनीला 8.3 इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे आणि तो चार नवीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. Appleचा दावा आहे की, हा त्याच्या श्रेणीतील सर्वात फास्ट टॅब्लेट आहे.

अॅपल आयपॅड मिनीला प्रथमच टाइप-सी यूएसबी पोर्ट देखील देण्यात आले आहे एवढेच नाही तर आयपॅड मिनी देखील 5G ​​ला सपोर्ट करेल. आयपॅड मिनीच्या मागील कॅमेऱ्यामध्ये स्मार्ट एचडीआर सपोर्टसह 12एमपी सेंसर दिले आहे. तर समोर,Apple ने 12MP सेन्सर देखील दिला आहे. सर्व iPads प्रमाणे मिनी देखील Centre stage फीचरला सपोर्ट करेल. एंट्री-लेव्हल आयपॅड फर्स्ट-जनरेशन पेन्सिलला सपोर्ट करतो, आयपॅड मिनी सेकंड-जनरेशन Apple पेन्सिला सपोर्ट करतो. Apple iPad mini देखील चार कलर व्हेरियंटमध्येम उपलब्ध होणार आहे

IPad मिनीची किंमत $ 499 आहे आणि ती आज प्रीऑर्डरसाठी उपलब्ध आहे. नवीन iPad मिनी आजपासून ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध असून शुक्रवार, 24 सप्टेंबरपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

loading image
go to top