Apple & LG Partnership: डोअरबेल, स्मार्ट लॉक ते सिक्युरिटी कॅमेरे; Apple अन् LG एकत्र लाँच करणार 6 हाय-टेक डिव्हाइसेस! 

Apple-LG Smart Home Range: स्मार्ट होम मार्केटमध्ये क्रांती: Apple अन् LG ची ऐतिहासिक युती; अ‍ॅमेझॉन-गुगलला मिळणार तगडे आव्हान!
Apple & LG Smart Home Partnership 6 New Devices to Challenge Amazon & Google

Apple & LG Smart Home Partnership: 6 New Devices to Challenge Amazon & Google

esakal 

Updated on: 

Apple & LG Smart Home Partnership: स्मार्ट होम तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठी घडामोड समोर आली आहे. आतापर्यंत प्रीमियम स्मार्टफोन आणि लॅपटॉप क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी 'Apple' कंपनी आता थेट स्मार्ट होम हार्डवेअर मार्केटमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. Apple ने प्रसिद्ध दक्षिण कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी 'एलजी'सोबत (LG Electronics) पार्टनरशिप केली असून, या दोन्ही कंपन्या मिळून 6 नवीन स्मार्ट होम प्रॉडक्ट्स लाँच करणार आहेत.

'ब्लूमबर्ग'चे प्रसिद्ध विश्लेषक मार्क गुरमन (Mark Gurman) यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, या नवीन उत्पादनांची घोषणा 13 ऑक्टोबरला Apple च्या विशेष कार्यक्रमात केली जाऊ शकते. या निर्णयामुळे स्मार्ट होम मार्केटमध्ये आधीच वर्चस्व असलेल्या अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि गुगल (Google) या दिग्गजांना मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com