

Apple Limits iPhone Purchases: Max 2 Units Per Customer
esakal
Apple Limits iPhone Purchases: तुम्ही नवीन आयफोन (iPhone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दिग्गज टेक कंपनी अॅपलने (Apple) आपल्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहकांसाठी आयफोन खरेदीचे नियम कडक केले आहेत. कंपनीने एका ग्राहकाला ठराविक मॉडेलचे 2 पेक्षा जास्त युनिट्स खरेदी करण्यावर बंदी घातली आहे.
सुरुवातीला हा नियम चीन, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांपुरता मर्यादित होता. पण, आता अॅपलने भारतासह अमेरिकेतही ही मर्यादा लागू केली आहे. अॅपलच्या या निर्णयामागील कारणे आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-