esakal | Apple चे नवीन आयफोन सीरिज उद्या होणार लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

आयफोन

Apple चे नवीन आयफोन सीरिज उद्या होणार लाँच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - Apple iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी. कंपनी उद्या iPhone मालिकेसह वेगवेगळे उत्पादने बाजारात आणण्याची शक्यता आहे. यास कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग असे शीर्षक देण्यात आले आहे. सर्वांचे लक्ष नव्या आयफोनकडे लागल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर उत्पादनेही लाॅन्च करण्याची शक्यता आहे. अॅपलच्या लाॅन्च इव्हेंटविषयी जाणून घेऊ या...

- Apple iPhone चा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार उद्या मंगळवारी (ता.१४) साडेदहा वाजता होईल. तुम्हाला कंपनीच्या संकेतस्थळ किंवा अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफाॅम्सवरुन हा इव्हेन्ट पाहात येईल.

Apple iPhone 13 मालिका

अॅपलच्या आगामी आयफोन १३ सीरिज (मालिका) उद्या १४ सप्टेंबर रोजी लाँच होत आहे. यात iPhone 13,iPhone 13 Pro, iphone 13 Pro Max आणि iPhone 13 Mini आदींचा समावेश असू शकतो. यात अद्ययावत फिचर्स कंपनी देणार आहे. यात खास गोष्ट म्हणजे लो अर्थ ऑर्बिट (लीईओ) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड. यामुळे युजर्श नेटवर्कशिवाय काॅल आणि मेसेज करता येऊ शकते.

नेटवर्क नाही तर टेन्शन नाही

युजर्सला स्मार्टफोनमध्ये नेटवर्क आहे की नाही याची चिंता करण्याची गरज नाही. बिगर नेटवर्कशिवाय मेसेज व फोन करण्याची सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात येईल. आणीबाणीच्या काळात तुम्हाला याची खूप मदत होईल.

स्मार्टफोनमधील फिचर्स

- ios 15, 115 bionic आदींवर काम करेल. यात फोटो प्रोसेसिंगसाठी लिक्विड क्रिस्टल पाॅलिमर सर्किट बोर्ड, नाईट मोड कॅमेऱ्याची सुविधा दिला जाईल.

- क्वालकाॅम एक्स ६० माॅडेल आणि वायफाय ६ ई सपोर्ट

- १३ मालिकेला mmwave 5G साठी सपोर्ट मिळू शकतो.

किंमत

- आयफोन १३ च्या ४ जीबी रॅम असलेल्या आयफोनची किंमत ७१ हजार ५१२ रुपये

- आयफोन १३ चे १२८ जीबी माॅडेलची किंमत ७७ हजार २५४ रुपये, तर २५६ जीबी रॅमच्या मोबाईलची किंमत ८६ हजार २८५ रुपये असू शकते.

loading image
go to top