AI Nude Image Generator Apps
AI Nude Image Generator AppseSakal

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

जाहिराती दिसल्यानंतरच कारवाई करण्यात आल्यामुळे, अ‍ॅपलला आतापर्यंत हे अ‍ॅप्स कसे दिसले नाहीत हा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.

Apple removes Nude Image Generating Apps : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयमुळे एकीकडे लोकांची भरपूर कामांमध्ये मदत होत आहे. मात्र दुसरीकडे याचा गैरवापर देखील केला जात असल्याचं समोर येत आहे. जनरेटिव्ह एआयच्या मदतीने न्यूड इमेज तयार करणाऱ्या कित्येक वेबसाईट्स आणि अ‍ॅप्स सध्या उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्सवर अ‍ॅपलने मोठी कारवाई केली आहे.

404 मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोअरवरुन अशा प्रकारचे न्यूड इमेज जनरेटिंग अ‍ॅप्स काढून टाकले आहेत. या अ‍ॅप्सच्या कित्येक जाहिराती इन्स्टाग्रामवर पाहण्यात आल्या होत्या. जाहिराती दिसल्यानंतरच कारवाई करण्यात आल्यामुळे, अ‍ॅपलला आतापर्यंत हे अ‍ॅप्स कसे दिसले नाहीत हा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे.

मेटाच्या अ‍ॅड लायब्ररीमध्ये शोध घेतल्यानंतर सुमारे पाच अशा अ‍ॅड्स दिसून आल्या. यातील दोन अ‍ॅड्स वेबसाईटच्या होत्या, तर तीन अ‍ॅप स्टोअरवरील अ‍ॅप्स होते. यातील काही अ‍ॅप्समध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा न्यूड इमेजवर बसवण्याचा पर्याय मिळत होता. या अ‍ॅप्सना 'अनड्रेसिंग' अ‍ॅप्स म्हटलं जातं. एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या फोटोमधील कपडे काढण्याचं काम हे अ‍ॅप्स करतात.

AI Nude Image Generator Apps
AI Danger : एआयच्या मदतीने महिलांचे निर्वस्त्र फोटो तयार करणाऱ्या अ‍ॅप्सना 'इतके' लोक देतात भेट; धक्कादायक रिपोर्ट समोर

मेटाने अशा प्रकारच्या जाहिराती दिसताक्षणी हटवण्यास सुरुवात केली होती. मात्र अ‍ॅपलने या अ‍ॅप्सवर कारवाई करण्यासाठी भरपूर वेळ लावल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अशाच प्रकारचे कित्येक डीपफेक अ‍ॅप्स यापूर्वीही आढळले आहेत. गुगलच्या प्ले-स्टोअरवर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर असे कितीतरी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यावर कारवाईची मागणी केल्यानंतर त्यांनी हे अ‍ॅप्स हटवण्याऐवजी त्याच्या जाहिराती बंद केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com