Apple Users : ऍपल युजर्सच्या खिशावर 'भार', आयफोनची बॅटरी बदलणे झाले प्रचंड महाग

आता ऍपलची बॅटरी बदलण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार
Apple Users
Apple Users esakal

Apple Users : तुमच्याकडे Apple ब्रँडचा iPhone किंवा iPad किंवा Mackbook असेल आणि बॅटरी बदलण्याची गरज असेल तर आता अधिक पैसे देण्यास तयार रहा. ऍपलने गेल्या महिन्यात उघड केलं होतं की आता बॅटरी बदलण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 1 मार्चपासून, जे त्यांच्या डिव्हाइसची बॅटरी बदलतील त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.

Apple Users
Instagram Tips : इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायचं आहे? या टिप्स तुमच्या रील्स लोकप्रिय बनवतील

जर तुमच्या डिव्हाइसची वॉरंटी संपली असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. काही काळापूर्वी कंपनीने आपल्या लेटेस्ट iPhone 14 सीरीजची बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट वाढवली होती आणि आता कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सची बॅटरी रिप्लेसमेंट कॉस्ट वाढवली आहे. Apple Insider च्या रिपोर्टनुसार, iPhone 14 च्या आधी आलेल्या सर्व iPhone मॉडेल्ससाठी बॅटरीची किंमत 20 डॉलरने (सुमारे 1644 रुपये) ने वाढवण्यात आली आहे.

Apple Users
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

होम बटणासह येणार्‍या आयफोनची बॅटरी बदलल्यास 49 डॉलरऐवजी 69 डॉलर मोजावे लागतील. त्याच वेळी, iPhone X आणि त्यानंतरच्या मॉडेल्ससाठी बॅटरीची किंमत 99 डॉलर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल.

Apple Users
Vaginal Health : या चुका करत असाल तर तुम्ही योनिच्या आरोग्याशी खेळताय...

मॅकबुक एअर बॅटरीची किंमत..

iPhone व्यतिरिक्त MacBook ची बॅटरी बदलण्यासाठी तुम्हाला 2466 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, MacBook Pro ची बॅटरीची किंमत 50 डॉलर (जवळपास 4111 रुपये) पर्यंत कमी करण्यात आली आहे.

Apple Users
Khandvi Recipe : तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत बेसन खांडवी कशी बनवाल?

iPad बॅटरी किंमत

आयपॅड बॅटरीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. नवीन 12.9 इंचाच्या iPad Pro बॅटरीसाठी 179 डॉलर म्हणजेच सुमारे 14,717 रुपये मोजावे लागतील. तेच फोर्थ जनरेशन iPad Pro (11-इंच) मॉडेलसाठी 12,251 रुपये मोजावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com