Social Media Day : सोशल मीडिया तुमच्यासाठी, की तुम्ही सोशल मीडियासाठी? कोण कुणाचा करतंय वापर?

सोशल मीडियामुळे हे विश्व एक खेडं झालं आहे.
Social Media Day
Social Media DayeSakal

सोशल मीडियामुळे जगात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. अगदी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बाबतीत यामुळे क्रांती घडून आली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच सोशल मीडियाचा सन्मान म्हणून ३० जून हा दिवस जगभरात सोशल मीडिया दिन म्हणून साजरा केला जातो.

आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कंपन्या आपली उत्पादनं अगदी ऑफिसमध्ये बसल्याबसल्या विकता आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या म्हणण्यापेक्षा जगातल्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट अगदी काही क्षणात तुमच्यापर्यंत येऊन पोचतोय आणि राजकीय क्रांतीचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतात पुन्हा एकदा निवडून आलेलं मोदी सरकार. सोशल मीडियामुळे हे विश्व एक खेडं झालं आहे.

Social Media Day
Social Media Day 2023 : आजपासून 26 वर्षांपूर्वी सुरू झालं होतं पहिलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जाणून घ्या

या सगळ्यात एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे, की तुम्ही सोशल मीडियाचा वापर कशासाठी करता? तुम्ही तासन् तास फेसबुक पोस्ट का वाचता, किंवा मग इन्स्टाग्रामवर रील्स का पाहता? या प्रश्नांची उत्तरं कदाचित अशी असू शकतात -

1. आवश्यक माहिती मिळवण्यासाठी

2. वेळ घालवण्यासाठी अर्थात टाईमपास म्हणून

3. आपल्या गोष्टी, आठवणी शेअर करण्यासाठी

तुमचं उत्तरही असंच असेल, तर तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही या माध्यमांचा वापर करून घेत आहात. मात्र, सत्य परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. खरंतर ही माध्यमं चालवणाऱ्या कंपन्याच तुमचा वापर करून घेत आहेत.

सोशल मीडिया फुकट असण्याचं देखील हेच मोठं कारण आहे. तुमचा वेळ आणि डेटा या कंपन्यांना आयता मिळत असल्यामुळे त्या सोशल मीडिया वापरण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, की तुमचा डेटा म्हणजे काय?

Social Media Day
Social Media Day : ३० जूनलाच का साजरा केला जातो सोशल मीडिया दिन? जाणून घ्या

सोशल मीडियावर तुम्ही तुमची माहिती टाकत असतात. शिवाय तुम्ही दिवासभरातील तुम्ही काय केलं,कुठे गेलात, कोणाला कुठे भेटलात ही माहिती देखील बऱ्याचदा शेअर करत असतात. मात्र याच तुमच्या माहितीचा 'डेटा' कंपन्यांना पैसे मिळवून देतात. 'सोशल मीडिया माध्यम' हे फक्त सामान्यांसाठी आहे. मात्र कंपन्यांसाठी ते निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. सामान्य माणसांच्या सवयी, आवडी-निवडी, त्यांचे उद्योग, व्यवसाय, खानपानाच्या सवयी या सर्व डेटाच्या आधारावर फेसबुक,ट्विटर, यू टयूब, इन्स्टाग्राम सारख्या परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणावर पैसा कमवत आहेत.

सोशल मीडिया कंपन्या तुमची माहिती वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना पुरवत असतात. इथूनच खऱ्या वास्तवाला सुरुवात होते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी काय आहेत. ते कुठे किती खर्च करताय. म्हणजेच जर तुम्ही एखादया मोठया हॉटेलमध्ये जेवायला गेलात किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलात त्याबद्दल फेसबुक, इंस्टा किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमावर माहिती टाकली की त्यानुसार तुमचा खर्च करण्याची कितपत ऐपत आहे. तुम्ही कोणत्या क्लासमध्ये मोडतात याचा बॅकेण्डला सविस्तर डेटा तयार होत असतो आणि त्यानंतर व्यक्तीला कस्टमाइज्ड प्रोडक्टची माहिती दिली जाते.

Social Media Day
Karnataka HC on Twitter : मोदी सरकार विरोधात जाणं ट्विटरला भोवलं; हायकोर्टाने ठोठावला ५० लाखांचा दंड

तुम्ही बसल्याबसल्या एखाद्या प्रॉडक्ट विषयी बातमी किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पुढच्या क्षणापासून त्यासंबंधित जाहिराती दिसायला सुरुवात होईल. इतकंच नाही तर एखाद्या जाहिरातीचा इतक्या मोठ्या प्रमाणावर भडिमार केला जाईल की तुमचं मन देखील ती घेण्यासाठी उद्युक्त होईल. शिवाय कस्टमाइज्ड जाहिराती दाखवल्या जातील की इथे ही वस्तु या किंमतीला मिळते आहे तर दुसऱ्या ठिकाणी ती अमुकच किंमतीला आहे. जेणेकरून एखाद्या ठिकाणी ती आताच स्वस्त मिळते आहे. त्यामुळे तुम्ही उद्या खरेदी करणारी वस्तु लगेच खरेदी करता.

सोशल मीडियाचा दुष्परिणाम

सोशल मीडिया डिझाईन अशा प्रकारे करण्यात आला आहे, की यूजर्स तिथे पुन्हा पुन्हा परत यावेत. यामुळेच इन्स्टाग्रामवरील रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स हे संपता संपत नाहीत. तुम्हाला यामध्ये किती वेळ गेला हे कळतही नाही. यामुळे अमेरिकेत एका शैक्षणिक संस्थेने या कंपन्यांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. कोणत्याही गोष्टीला जशी चांगली बाजू असते, तशी वाईटही असते. त्यामुळे सोशल मीडियाचा अति वापर टाळणेच फायद्याचं आहे.

Social Media Day
US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com