आता इंग्रजी शिका घरबसल्या तेही एका क्लिकवर!

कृपादान आवळे
Saturday, 13 June 2020

इंग्रजीची भीती अनेकांना वाटत असते. आपल्या समोर एखादी व्यक्ती अस्खलित इंग्रजीत बोलत असेल, तर आपल्यालाही त्याच्यासारखे बोलण्याची इच्छा आपोआप होते. इंग्रजी शिकविण्याचे सध्या अनेक वर्ग उपलब्ध आहेत. तसेच, काही पुस्तकेही बाजारात मिळत आहेत. पण इंग्रजी बोलण्यासाठी, समजण्यासाठी तुमच्या हातातील स्मार्टफोनच तुम्हाला मोठी मदत करणार आहे.

इंग्रजीची भीती अनेकांना वाटत असते. आपल्या समोर एखादी व्यक्ती अस्खलित इंग्रजीत बोलत असेल, तर आपल्यालाही त्याच्यासारखे बोलण्याची इच्छा आपोआप होते. इंग्रजी शिकविण्याचे सध्या अनेक वर्ग उपलब्ध आहेत. तसेच, काही पुस्तकेही बाजारात मिळत आहेत. पण इंग्रजी बोलण्यासाठी, समजण्यासाठी तुमच्या हातातील स्मार्टफोनच तुम्हाला मोठी मदत करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंग्रजी शिकविण्यासाठी सध्या अनेक मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. काही ॲप्स ठरावीक रक्कम आकारून शिकवतात, तर काही अगदी मोफत शिक्षण देतात. मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेटर, इंग्लिश-मराठी ट्रान्सलेटर, इंग्लिश-मराठी डिक्‍शनरी, इंग्लिश टू मराठी डिक्‍शनरी या भाषांतर आणि इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगणाऱ्या ‘ॲप’चा वापर केल्यास घरबसल्या इंग्रजी शिकता येण्यास नक्कीच मदत होऊ शकणार आहे. यातील काही ॲप्सची माहिती जाणून घेऊया. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर - हे ‘ॲप’ गुगलच्या प्ले स्टोअरवरून स्मार्टफोनमध्ये घेता येऊ शकते. या ‘ॲप’च्या माध्यमातून इंग्रजी मजकूर मराठीत आणि मराठी मजकूर इंग्रजीमध्ये क्षणार्धात भाषांतरित करता येऊ शकतो. याशिवाय आपण इंग्रजी अथवा मराठीत वाचन केले, तर त्याचेही भाषांतर करण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून तोंडी बोललेलेही टाइप केले जाते. याचा मोठा फायदा होऊ शकतो.

इतकेच नाहीतर यातील विशेष बाब म्हणजे या ‘ॲप’मध्येच फोटोचे एक फीचर दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून एखाद्या कागदावर असलेला मजकूर मग तो मराठी असो की इंग्रजी, त्याचेही भाषांतर करण्याची सोय यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यामध्ये टेक्‍स्ट एसएमएस म्हणून एक पर्याय देण्यात आला असून, या पर्यायाच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेश वाचता आणि पाठवता येऊ शकतात.

इंग्लिश-मराठी ट्रान्सलेटर : इंग्लिश-मराठी ट्रान्सलेटर हे ‘ॲप’ही गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ‘ॲप’च्या माध्यमातून कोणताही इंग्रजी किंवा मराठी मजकूर भाषांतरित करता येऊ शकतो. आपण मराठी किंवा इंग्रजी भाषेत बोलल्यास आपल्याला हव्या असलेल्या मराठी किंवा इंग्रजी भाषेत भाषांतरित करून मिळू शकतो. इंग्रजीतून मराठी भाषांतर करण्यासाठी किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी एक क्‍लिक करण्याची गरज आहे, त्यानंतर लगेचच भाषांतर होऊ शकते. 

इंग्रजी शब्दांचे अर्थ समजण्यासाठी...

इंग्लिश-मराठी डिक्‍शनरी : इंग्लिश-मराठी डिक्‍शनरी या ‘ॲप’च्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ लगेचच मिळू शकतो. हे एक ऑफलाइन ॲप असल्याने याला इंटरनेटची गरज भासत नाही, त्यामुळे तुम्हाला हव्या त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ एका क्‍लिकवर मिळवता येतोच. याचबरोबर त्याच्यासंदर्भात क्रियापद किंवा संबंधित शब्दांचे अर्थही आपल्या मिळवता येतात. याशिवाय या ‘ॲप’मध्ये गेमचा पर्यायही देण्यात आला आहे. या माध्यमातून इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ दिले गेले आहेत, त्यामध्ये काही पर्यायही दिले गेले.  

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लिश टू मराठी : या ‘ॲप’च्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, आपण इंग्रजी शब्दाची काही अक्षरे जरी टाकली तरी त्या संदर्भात असलेले अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला मिळू शकतात. याशिवाय आपल्याला इंग्रजी शब्दाचा उच्चार करायचा कसा, असा प्रश्न बऱ्याचदा पडलेला असतो. मात्र, या ‘ॲप’मधून आपल्याला इंग्रजी शब्दाचा उच्चारही कसा करायचा हे समजू शकते. याशिवाय, या ‘ॲप’च्या माध्यमातून इंग्रजी शब्दांची चाचणीही घेण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article krupadan awale on appning