ॲप + : वेळ तुमच्या हाती...

सम्राट फडणीस
Sunday, 15 March 2020

वापर कसा मर्यादित करते ॲप? 
१. चॅलेंजेस 
२. पॉइंट्स 
३. व्हॉट्सॲप/फेसबुकसारखी ॲप कितीवेळा ओपन केली, याचे ग्राफ

कोणीतरी मैत्रिणीला म्हणाले, ‘‘अगं कित्ती वेळ डोकं घालून बसतेस मोबाईलमध्ये...दुसरं काही आहे की नाही..?’’ 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तिनं फणकाऱ्यानं वर पाहिलं खरं; पण आतून कुठंतरी तिलाही वाटून गेलं, ‘‘खरंच की काय आपण मोबाईलमध्ये सतत अडकून असतो...? असं काही असणार; नाहीतर कित्येकदा लोक असं बोलून का जातात आपल्याला?’’ 

मैत्रीण पुन्हा मोबाईलकडंच पाहात विचार करू लागली. मोबाईलवरच शोधू लागली आणि तिला मिळालं नवं ॲप. ते डाऊनलोड केल्यानंतर मिळालेले रिझल्ट भन्नाट होते. मैत्रीण दिवसातून सव्वातीन तास मोबाईलवर आहे, असं ॲपनं सांगितलं. मग, ती वळली इतरांच्या मोबाईल वापराकडं. तिचा सहकारी, जो तिला सतत याचा विषयावरून डिवचायचा, त्याचा मोबाईल वापर निघाला पाच तास...!  मैत्रीणीचा हा अनुभव बाजूला ठेवू. आपण मोबाईलशी ॲडिक्‍ट आहोत का, हे शोधण्याचा सोपा पर्याय म्हणजे YourHour ॲप. गेले वर्षभर ॲप वापरल्यानंतरचे निष्कर्ष भन्नाट आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article samrat phadnis on yourhour app