‘ॲप’निंग : घरच्या घरी व्हिडिओ एडिटिंग

appning
appning

सध्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यातही ते फोटो किंवा व्हिडिओ हे व्यवस्थित एडिट करून अपडेट करायची पद्धत आहे. अलीकडे अनेक जण वैयक्तिक जीवनातील सुंदर क्षणांच्या फोटोंचा व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. अनेकांना कुतूहल असते, की हे व्हिडिओ कसे तयार करतात? पण, तुम्हाला माहीत आहे का, हे व्हिडिओ एडिट करण्यासाठी प्रत्येक वेळी व्यावसायिक तज्ज्ञाची गरज नसते. असे काही ‘हटके’ मोबाईल ॲप्स आहेत ज्यात तुम्ही घरच्या घरी काही व्हिडिओ एडिट करू शकता. त्यापैकीच एक म्हणजे ‘क्विक’ ॲप! 

‘क्विक ॲप’ हे ॲप नावाप्रमाणेच जलद काम करते. लहान व्हिडिओ तयार करण्यासाठी उपयुक्त असलेले हे ‘ॲप’ वापरायलाही अगदी सोपे आहे. या ‘ॲप’मध्ये काही मोजक्‍या क्रमवार कृती पूर्ण केल्या की तुमचा व्हिडिओ तयार. यात फोटो आणि व्हिडिओ क्‍लिप्सच्या मदतीने मोठा व्हिडिओ तयार करता येतो. ‘ॲप’मध्ये दिलेल्या कृतींनुसार व्हिडिओत हवे असलेले फोटो निवडून त्याला वेगवेगळे इफेक्‍ट्‌स देता येतात. एखादे सूत्र ठरवून हवा तसा व्हिडिओची थीम ठरवून हवा तसा व्हिडिओ तयार करता येतो.

त्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तसेच या ‘ॲप’मध्ये असलेल्या विविध कल्पना वापरून व्हिडिओ आणखी सजवता येतो. या ‘ॲप’मध्ये फोटोंचा व्हिडिओ तयार करता येतोच; पण त्यासोबत छोटे व्हिडिओ एकमेकांना जोडूनही व्हिडिओनिर्मिती करता येते. सोशल मीडियामध्ये या ‘ॲप’ची मागणी वाढली आहे, कारण कमी वेळात, हातातल्या स्मार्टफोनमध्ये हवा तसा व्हिडिओ तयार व एडिटही करता येतो. 

बऱ्याचदा काही व्हिडिओ तयार करण्यासाठी व्यावसायिक तज्ज्ञावर (एडिटर) अवलंबून राहावे लागते. मात्र, ‘क्विक’मध्ये उत्तमरीत्या व्हिडिओ एडिटिंगची सोय आहे. जास्तीत जास्त ७५ फोटो निवडून व्हिडिओ तयार करता येतो. या ॲपमध्ये २३ व्हिडिओ कल्पना प्रारूपे आहेत, ज्यातील तुम्हाला जे चांगले वाटेल ते निवडू शकता. तसेच शंभराहून अधिक साउंडट्रॅक उपलब्ध आहेत. याशिवाय तुमच्या संग्रहातील ऑडिओही व्हिडिओला लावू शकता. प्रत्येक फोटोला कालावधी देता येतो. एखादा फोटो किती वेळ ठेवायचा हे आपण ठरवू शकतो. तसेच ‘ॲप’च्या अपडेट व्हर्जनमध्ये फोटो एडिटिंगसाठी वेगवेगळे फिल्टर देण्यात आले आहेत. 

या ‘ॲप’ची अन्य वैशिष्ट्ये अशी-  प्रत्येक फोटोचा कालावधी (टाइम ड्युरेशन) ठरवता येतो. प्रत्येक फोटोचा आकार कमी-जास्त करता येतो. काही महत्त्वाचे फोटो अधिक ठळक करता येतात.  व्हिडिओवर मजकूर लिहिता येतो. त्याला संगीत देता येते. त्यासाठी शंभराहून अधिक उत्तम पर्याय आहेत. शिवाय ते  एचडी स्वरूपात सेव्ह होतात. तसेच सात दिवसांपर्यंत ते एडिटही करता येतात.  

‘क्विक’ व्हिडिओ ‘ॲप’च्या वापराच्या क्रमवार पायऱ्या पुढीलप्रमाणे- १) फोटो/व्हिडिओ क्रमानुसार निवडणे २) व्हिडिओला शीर्षक देणे ३) थीम निवडणे ४) फोटोचा कालावधी, आकार ठरविणे ५) संगीताची धून निवडणे ६) व्हिडिओ सेव्ह करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com