अॅपनिंग : आता अॅपच शोधेल हिडन कॅमेरा

Hidden-Camera
Hidden-Camera

आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन सुकर झाले आहे. अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा काही लोक गैरवापर करून इतरांना अडचणीत आणतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण सध्या खूपच वाढले आहे. त्यामुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा सर्रास गैरवापर होताना दिसतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा किंवा स्पाय कॅमेरा. छुप्या कॅमेऱ्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी आता विविध अॅप उपलब्ध असून, ते अत्यंत उपयुक्त आहेत. 

हिडन कॅमेरा आणि स्पाय कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांना, विशेषतः महिलांना अडचणीत आणले जाते. हॉटेल आणि तयार कपड्यांच्या शोरूममधील चेंजिग रूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रीकरण केल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असतात. एखाद्यावर पाळत ठेवण्यासाठीदेखील स्पाय कॅमेऱ्याचा वापर केला जातो. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या अशा गैरवापरावर तंत्रज्ञानानेच आता उपाय शोधला आहे. तो म्हणजे स्पाय/हिडन कॅमेरे शोधणारे अॅप. 

सतत कोणीतरी आपल्याला पाहत आहे, छुप्या कॅमेऱ्यातून आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, असे तुम्हाला वाटते काय? छुपे कॅमेरे शोधणारे अॅप उपलब्ध असल्याने तुमची ही चिंता दूर होऊ शकते. अॅ्न्ड्रोईड आणि आयफोनमध्ये हे अॅप वापरता येते. छुपे कॅमेरे शोधणाऱ्या अॅपमुळे तुम्ही कोठेही सुरक्षित राहू शकता. तसेच तुमच्या वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता राखण्यासही त्यामुळे मदत होते. हॉटेल, शॉपिंग मॉल, ऑफिस, घर कोठेही हे अॅप वापरून तुम्ही छुपा कॅमेरा शोधू शकता. 

कसे वापरावे छुपा कॅमेरा शोधणारे अॅप? 
छुपा कॅमेरा शोधणाऱ्या अॅपद्वारे दोन पर्याय दिले जातात. 
इन्फ्रेरड्‌ : मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. बाथरुम, बेडरुम, चेंजिग रुम अथवा इतर कोणत्याही ठिकाणी वॉटर हिटर, आरसा, फ्लॉवरपॉट, बल्ब, ट्यूब, एसी, टीव्ही, कॉफी मशीन, हॅंगर यासारख्या संशयास्पद वस्तू स्कॅन करून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. 
रेडिएशन : रेडिएशनद्वारे तुमच्या आसपास असलेल्या छुप्या कॅमेऱ्याची मोबाईलद्वारे माहिती मिळते. त्यानुसार छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेता येतो. 

छुपा कॅमेरा आढळल्यास काय करावे?
१) सर्वांत आधी छुप्या कॅमेऱ्याचे फोटो पुरावा म्हणून काढून ठेवावेत.
२) छुपा कॅमेरा कपड्याने झाकावा.
३) तातडीने पोलिसांना फोन करून संबधित प्रकाराची माहिती द्यावी.
४) संबंधित ठिकाणच्या व्यवस्थापकांना याबाबत माहिती देऊन त्यांच्याकडे विचारणा करावी.
५) इतरांना छुप्या कॅमेऱ्याबाबत कल्पना द्यावी. 
छुपा कॅमेरा शोधणारे अनेक अॅप ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण सार्वजनिक ठिकाणचा आपला वावर सुरक्षित करू शकतो. हे अॅप असेः १) रादरबोट फ्री (Radarbot Free) - अॅ्न्ड्रोईड आणि आयफोन  २) स्पाय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - अॅ्न्ड्रोईड आणि आयफोन ३) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - आयफोन ४) डोन्ट स्पाय- स्पाय डिव्हाईस डिटेक्‍टर - आयफोन ५) हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - अॅ्न्ड्रोईड  ६) हिडन- स्पाय कॅमेरा-ॲन्ड्रॉइड  ७) स्पॉय हिडन कॅमेरा डिटेक्‍टर - अॅ्न्ड्रोईड  ८) स्पाय कॅमेरा डिटेक्‍टर -अॅ्न्ड्रोईड९) हिडन कॅमेरा- अॅ्न्ड्रोईड १०) स्पाय कॅमेरा फाउंडर - अॅ्न्ड्रोईड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com