
३६ अब्ज सूर्यमानांचा सर्वात मोठा ब्लॅकहोल 'कॉस्मिक हॉर्सशू' आकाशगंगेतील शोधला गेला.
गुरुत्वाकर्षण लेन्सिंग आणि तारकीय गतीद्वारे त्याचे वस्तुमान निश्चित झाले.
हा निष्क्रिय ब्लॅकहोल आकाशगंगांच्या उत्क्रांतीबाबत नवीन संशोधनाला चालना देईल.
खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातील सर्वात मोठ्या ब्लॅकहोलचा शोध लावला आहे, ज्याचे वस्तुमान तब्बल सूर्याच्या ३६ अब्जवेळाच्या साइज एवढा आहे. हा प्रचंड ब्लॅकहोल आपल्या आकाशगंगेतील केंद्रस्थानी असलेल्या ब्लॅकहोलपेक्षा १०,००० पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून सुमारे ५ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'कॉस्मिक हॉर्सशू' नावाच्या विशाल आकाशगंगेच्या केंद्रात हा राक्षस वसलेला आहे. या शोधाने ब्लॅकहोल आणि आकाशगंगांच्या उत्क्रांतीबाबतच्या आपल्या समजुतीला नवे परिमाण दिले आहे.