Asus चे दोन पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन्स भारतात लॉंच, पाहा फीचर्स

Asus ROG Phone 5s ROG Phone 5s PRO launched in India
Asus ROG Phone 5s ROG Phone 5s PRO launched in India

मोबाईल गेमिंग प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. Asus ने भारतात आपले दोन नवीन पावरफुल गेमिंग स्मार्टफोन - Asus ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro लॉन्च केले आहेत. चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स (Features & Specifications)

दोन स्मार्टफोन्समधला फरक फक्त रॅम आणि स्टोरेज ऑप्शन इतकाच आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शनसह येतो. त्याच वेळी, फोनचा प्रो व्हेरिएंट फक्त 18 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कंपनीच्या 1080x2448 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा Samsung AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो.

Asus ROG Phone 5s ROG Phone 5s PRO launched in India
Cheapest 2GB Plan : कोणता रिचार्ज प्लॅन आहे तुमच्यासाठी बेस्ट? वाचा

किंमत

ROG Phone 5s च्या 8 GB RAM + 128 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे आणि 12 GB RAM + 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 57,999 रुपये आहे. ROG Phone 5s Pro बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने हा फक्त 18 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत 79,999 रुपये आहे. या स्मार्टफोन्सची विक्री 18 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.

Asus ROG Phone 5s ROG Phone 5s PRO launched in India
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

बेस्ट गेमिंग एक्सपिरीएंससाठी फोन 24ms ची टच लेटन्सी आणि 1200 nits ची पिक ब्राइटनेस ऑफर करतो. दोन्ही डिव्हाइसेसमध्ये डिस्प्ले सुरक्षेसाठी कंपनी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टससह 2.5D कर्व्ह्ड ग्लास ऑफर करत आहे. प्रोसेसर म्हणून, तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 888+ चिपसेट आणि Adreno 660 GPU पाहायला मिळेल.

फोटोग्राफीसाठी, Asus या दोन्ही स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे. यात 64-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिली आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 24-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

Asus ROG Phone 5s ROG Phone 5s PRO launched in India
गुगल ड्राइव्हचे 'हे' 5 भन्नाट फीचर्स, फार कमी लोकांना आहेत ठाऊक

अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6000mAh बॅटरी दिल्या आहेत, ज्या 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देतात. चांगल्या साऊंडसाठी कंपनी या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅकसह ड्युअल फ्रंट स्पीकर देखील देत आहे. कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही फोनमध्ये Wi-Fi आणि 5G सह सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत. कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन Android 11 वर आधारित ROG UI वर काम करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com