
ऑडीची नवीन लक्झरी कार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स
2022 Audi A8 L Launch : प्रीमियम कार बनवणारी कंपनी ऑडीने मंगळवारी आपली लोकप्रिय आणि प्रीमियम सेडान कार A8 L (2022 Audi A8 L) भारतात लॉन्च केली. कंपनीने ही कार 1.29 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात सादर केली आहे. सेलिब्रेशन एडिशन आणि टेक्नॉलॉजी एडिशन या दोन व्हेरिएंटमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे.
किंमत किती आहे?
Audi A8 L सेलिब्रेशन एडिशन (Celebration Edition) व्हेरिएंटची किंमत 12,900,000 रुपये आहे तर या कारच्या Audi A8 L च्या टेक्नोलॉजी एडिशन (Technology Edition) व्हेरिएंटची किमत ही 15,700,000 रुपये इतकी असणार आहे. तसेच ही कार आठ स्टँडर्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ऑडीने भारतात या वर्षी 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने ही कार (Audi A8 L) सादर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. यापैकी एक अतिशय खास फीचर म्हणजे फूट मसाज हे आहे. दुसऱ्या रांगेच्या बाजूच्या प्रवासी सीटमध्ये तीन पायांच्या आकाराचे हीटेड फुट मसाज सिस्टीम देण्यात आले आहेत.
हेही वाचा: Nokia ने भारतात लॉन्च केला स्वस्तात मस्त फोन, 3 दिवस चालेल बॅटरी
तसेच कारमध्ये ऑडी फोन बॉक्स दिला असून यामध्ये मोबाईल फोन वायरलेस चार्जरने चार्ज केला जाऊ शकतो. कारला मीडिया आणि क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, पॅनोरामिक सनरूफ, टेल लाईट सिग्नेचरसह ओएलईडी रिअर लाइट, डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, फर्स्ट क्लास केबिन, आरामदायी सीट्स देण्यात आहेत.
कार इंजिन तसेच इतर फीचर्स
2022 ऑडी A8 L फेसलिफ्ट कारला 3.0-लिटर TFSI (पेट्रोल) 48V माईल्ड-हायब्रिड इंजिन सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचे इंजिन 340 hp आणि 500 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडते.
कारमध्ये मागील सीट एंटरटेनमेंट सिस्टम, मागील सीट रिमोट, बँग आणि ओल्यूएफसनची अडव्हांस 3D साउंड सिस्टम (1920 W, 3 स्पीकर), मॅट्रिक्स एलईडी रीडिंग लाइट्स, कस्टमाइज्ड लाइटिंग पॅकेज प्लस, हेड्स अप डिस्प्ले आणि बरेच काही देण्यात आले आहे.
हेही वाचा: बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर महागलं; जाणून घ्या किती वाढली किंमत
सुरक्षा व्यवस्था
अपघात झाल्यास, दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी ऑडीचे प्री सेन्स बेसिक काही सेकंदात सक्रिय केले जाते. पुढील आणि मागील सीटबेल्टला संरक्षणात्मक पद्धतीने आपोआप घट्ट करण्याचा पर्याय देखील आहे. कारमध्ये एकूण 8 एअरबॅग्ज (पुढील आणि मागील सीटसाठी साइड एअरबॅग्ज समाविष्ट आहेत). हे 10 एअरबॅग्स पर्यंत अपग्रेड केले जाऊ शकते. कार पार्क असिस्ट प्लस सुविधेसह येते.
Web Title: Audi A8 L Launch In India Price Specifications Performance Details In Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..