esakal | Audio App Clubhouse नं लाँच केलं नवीन payment फिचर; असं करा easy payment 
sakal

बोलून बातमी शोधा

Audio App Clubhouse launches new payment feature Nagpur news

चीनबाहेरील यूजर्सना यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु एक पर्याय देखील आहे की जर क्लबहाऊसचा एखादा जुना यूजर पैसे पाठवत असेल तर क्लबहाऊसमध्ये सामील होऊ शकेल. परंतु प्रत्येक युजरकडे  केवळ दोन Invite पाठवण्याचा पर्याय असेल. 

Audio App Clubhouse नं लाँच केलं नवीन payment फिचर; असं करा easy payment 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : ऑडिओ अॅप Clubhouse ने त्याच्या क्रिएटर्ससाठी सर्वात विशेष फिचर लाँच केले आहे. या वैशिष्ट्याद्वारे यूजर्स कोणालाही पैसे पाठविण्यास सक्षम असतील. मात्र यूजर्सना पैसे प्राप्त करण्याची सुविधा मिळणार नाही.

क्लबहाऊसचे म्हणणे आहे की पैसे भरल्यानंतर यूजर्सना प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. कंपनीने पुढे म्हटले आहे की सध्या हे फिचर निवडक युजर्ससाठी सादर केले गेले आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी लाँच केले जाईल.  यूजर्स ऑडिओ चॅट रूममध्ये एकत्रित होऊ शकतात आणि विविध विषयांवर चर्चा करू शकतात.

क्लबहाऊस अ‍ॅप थेट ऑडिओ चॅटरूम प्रदान करते. यूजर्सना यासाठी दुसर्‍या यूजर्सकडून आमंत्रण मिळालं असेल तरच या अ‍ॅपमध्ये सामील होता येईल. चिनी यूजर्सना त्यांची नोंदणी करण्यासाठी अमेरिकन अ‍ॅप स्टोअरला भेट द्यावी लागत होती. तिथे त्याचा फोन नंबर नोंदविल्यानंतरच त्यांना invite लिंक होती. पण चीनबाहेरील यूजर्सना यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु एक पर्याय देखील आहे की जर क्लबहाऊसचा एखादा जुना यूजर पैसे पाठवत असेल तर क्लबहाऊसमध्ये सामील होऊ शकेल. परंतु प्रत्येक युजरकडे  केवळ दोन Invite पाठवण्याचा पर्याय असेल. 

मार्च 2020 मध्ये आयओएस यूजर्ससाठी क्लब हाऊस बाजारात आला. हे सिलिकॉन व्हॅलीचे उद्योजक पॉल डेव्हिडसन आणि रोहन सेठ यांनी तयार केले होते. मे 2020 मध्ये क्लबहाऊसचे सुमारे 1,500 वापरकर्ते होते आणि त्याचे मूल्य 100 दशलक्ष होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image