भाज्या खाण्यात ऑस्ट्रेलियन आघाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

आरोग्य आणि आहाराविषयी "ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्य असलेल्या 28 देशांतील नागरिकांच्या आहारातील भाज्यांच्या प्रमाणाविषयी नुकतेच सर्वेक्षण असून, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात 99 टक्के नागरिकांमध्ये रोजच्या आहारात भाज्या खाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या देशामध्ये भाज्यांच्या योग्य सेवनामध्ये पुरुषापेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

आरोग्य आणि आहाराविषयी "ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्य असलेल्या 28 देशांतील नागरिकांच्या आहारातील भाज्यांच्या प्रमाणाविषयी नुकतेच सर्वेक्षण असून, ऑस्ट्रेलियन नागरिकांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात 99 टक्के नागरिकांमध्ये रोजच्या आहारात भाज्या खाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या देशामध्ये भाज्यांच्या योग्य सेवनामध्ये पुरुषापेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या आहारामध्ये भाज्यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे, याविषयी जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. भाज्या मानवी आहारातील तंतुमय पदार्थ (फायबर) आणि पोषक घटकांच्या पूर्ततेसाठी उपयुक्त असतात. अनेक देशांत बटाट्याशिवाय अन्य भाज्या खाण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. भाज्या खाण्याचे योग्य प्रमाण असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये कोरिया, न्यूझीलंड, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. ओईसीडीच्या या अहवालामध्ये बटाट्याचा भाजीचा समावेश केलेला नव्हता. आश्‍चर्याची बाब म्हणजे जर्मनीमध्ये भाज्या खाण्याचे प्रमाण खूपच कमी आढळले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian leading eating vegetables