esakal | ग्लॅमर ‘एक्सटेक’ मोटरसायकल बाजारात; हिरो मोटोकॉर्पची दुसऱ्या तिमाहीत घोडदौड
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लॅमर ‘एक्सटेक’ मोटरसायकल बाजारात दाखल

ग्लॅमर ‘एक्सटेक’ मोटरसायकल बाजारात दाखल

sakal_logo
By
प्रणीत पवार

हिरो मोटोकॉर्प hero motocorp कंपनीने २०२२ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) तब्बल दहा लाखाहून अधिक दुचाकींची विक्री केली आहे. आता हिरो मोटोकॉर्पने ‘ग्लॅमर’ या दुचाकीचा ‘एक्सटेक’ हा अवतार बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे या दुचाकीमुळे दुसऱ्या तिमाहीची (जुलै-सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. ग्लॅमर एक्सटेकची दिल्ली एक्स शोरूम किंमत ड्रम व्‍हेरिएण्‍टसाठी ७८,हजार ९०० रुपये तर, डिस्क व्‍हेरिएण्‍टसाठी ८३ हजार ५०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (auto-hero-motocorp-launches-glamour-xtec-with-rs-78-900-price-tag-ssj93)

ग्लॅमर एक्सटेकमध्ये शैली, सुरक्षितता व कनेक्टिव्हिटी या गोष्टींचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर आदी सुविधांसह ग्लॅमर एक्सटेकमध्ये साइड-स्टॅण्ड इंजिन कट-ऑफ, बॅक अँगल सेन्सर व एलईडी हेडलॅम्प आदी फिचर्सही दिले आहेत.

नवीन ग्लॅमर एक्सटेक ही या विभागात ‘एक्स’ फॅक्टर घेऊन आली आहे. ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एलईडी हेडलॅम्प आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन या सुविधा प्रथमच देण्यात आल्या आहेत. तरुणाईला आकर्षित करणाऱ्या अनेक सुविधा या मोटरसायकलमध्ये देण्यात आल्या आहेत. आदर्श संगम या मोटकसायकलमध्ये साधण्यात आल्याचे हिरो मोटोकॉर्पच्या स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल प्रोडक्ट प्लानिंग विभागाचे प्रमुख मालो ले मॅसाँ यांनी सांगितले. तर या मोटारसायकलमुळे १२५ सीसी विभागाला नवा आयाम मिळणार आहे, असा विश्वास हिरो मोटोकॉर्पच्या विक्री विभागाचे प्रमुख नवीन चौहान यांनी व्यक्त केला.

इंजिन क्षमता -

नवीन ग्लॅमर एक्सटेकमध्ये १२५ सीसी बीएस-६ इंजिन देण्यात आले आहे. या मोटारसायकलचे इंजिन ७५०० आरपीएमवर १०.७ बीएचपी ऊर्जा निर्माण करते, तर ६००० आरपीएमवर १०.६ एनएम टॉर्क निर्माण करते. हिरो मोटोकॉर्पचे आय३एस (आयडीयल स्टार्ट-स्टॉप प्रणाली) ऑटो सेल तंत्रज्ञान ग्लॅमर एक्सटेकमध्ये वापरण्यात आले आहे.

संपादन : शर्वरी जोशी

loading image