
How to properly clean a phone charging port without damage: आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन असून हा सध्या अविभाज्य भाग झाला आहे. अनेक लोक घराबाहेर पडताना पहिले फोन सोबत आहे की नाही हे चेक करतात. जेव्हा आपण कोणतीही वस्तू वापरतो तेव्हा आपल्याला त्याची काळजी आणि स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. जसे आपण रोज शरीराची स्वच्छता ठेवतो. जर बराच वेळ एखाद्या वस्तूची स्वच्छता केली नाही तर ते खराब होते. त्यात धूळ आणि माती साचून तांत्रिक बिघाड येऊ शकते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरत राहिलात आणि त्याचे भाग स्वच्छ केले नाहीत तर त्यात समस्या येऊ लागतात. अशावेळी काही लोक बाहेरून स्वच्छता करून घेतात तर काही लोक स्वतः करतात. पण पुढील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.