Hotel Booking Tips : हॉटेल बुकिंग करतानाची 'ही' एक चूक पडेल महागात; होऊ शकतो मोठा फ्रॉड, आत्ताच जाणून घ्या

Hotel Booking Safety Tips Masked Aadhar Card : हॉटेल बुक करताना होणाऱ्या लहानसहान चुकांमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशात पुढील काही टीप्स फॉलो करून सुरक्षित राहू शकता.
Hotel Booking Safety Tips Masked Aadhar Card
Hotel Booking Safety Tips Masked Aadhar Cardesakal
Updated on

Security Tips : कामानिमित्त विविध शहरांमध्ये प्रवास करावा लागतो आणि हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागते का? जर होय, तर हॉटेल बुकिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः, आपले मूळ आधार कार्ड हॉटेलमध्ये दाखवण्याची चूक टाळा. अशा चुकीमुळे तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

हॉटेलमध्ये चेक-इनसाठी काय वापरावे?

बहुतेक हॉटेल्स चेक-इनच्या वेळी ओळखपत्र मागतात आणि बरेच जण सोयीसाठी आधार कार्ड दाखवतात. मात्र, मूळ आधार कार्डामध्ये तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते, जी चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यास गैरवापर होऊ शकतो. अशा प्रकारच्या चुकीमुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

आधार कार्ड वापरणे टाळणे शक्य नसेल, तर UIDAI कडून मिळणारे मास्कड आधार कार्ड हा सुरक्षित पर्याय आहे. मास्कड आधार कार्डमध्ये तुमचा पूर्ण आधार क्रमांक दिसत नाही; फक्त शेवटचे चार अंक आणि इतर माहिती अस्पष्ट स्वरूपात दाखवली जाते. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी हा पर्याय अधिक सुरक्षित आहे.

Hotel Booking Safety Tips Masked Aadhar Card
Redmi Note 13 Pro + : खुशखबर! Redmi Note सीरिजच्या ब्रँड 5G मोबाईलवर मिळतोय चक्क 11 हजारांचा डिस्काउंट; कुठं सुरुय ऑफर? पाहा एका क्लिकवर

मास्कड आधार कसे डाऊनलोड करावे?

1. UIDAI च्या myaadhaar.uidai.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.

2. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी टाका.

3. OTP सत्यापित केल्यानंतर Services विभागातून Download Aadhaar पर्याय निवडा.

4. माहिती पाहण्याच्या प्रोसेससाठी Masked Aadhaar हा पर्याय निवडा.

5. शेवटी Download बटणावर क्लिक करून PDF स्वरूपात तुमचे मास्कड आधार कार्ड सेव्ह करा.

Hotel Booking Safety Tips Masked Aadhar Card
New ISRO Chief : कोण आहेत इस्रोचे नवे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन? चांद्रयान अन् गगनयानच्या शिल्पकाराबद्दल 'या' गोष्टी माहिती असायलाच हव्यात

हॉटेलमध्ये चेक-इन करताना मूळ आधार कार्ड न वापरता मास्कड आधार कार्ड वापरा. तसेच, शक्यतो पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर ओळखपत्रांचा वापर करा. तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हीच सर्वांत महत्त्वाची बाब आहे.

यापुढे हॉटेल बुकिंग करताना आणि चेक-इन करताना या टिप्स लक्षात ठेवा. कारण थोडीशी काळजी तुमच्या वैयक्तिक माहितीचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com