WhatsApp वापरताना 'या' कधीच करू नका; अन्यथा घडू शकते जेलवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp वापरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा...

WhatsApp वापरताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : मेसेज पाठविण्यासाठी आपण व्हाट्सएपचा(WhatsApp) वापर करतो. मात्र मेसेज पाठवताना कधीकधी अशी चूक करतो, ज्यामुळे डेटा लिकचा (Data Leak) धोका वाढू शकतो आणि तुरुंगात जावे लागू शकते. आज आम्ही आपल्याला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही WhatsApp वापरताना कधीच करू नये. चला जाणून घेऊया. (avoid this type of messages while using whatsapp)

हेही वाचा: मधमाश्यांनाही आवडतं आईसक्रीम? त्यांचं आइसक्रीम नक्की कोणतंय? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट अकाउंट तयार करून लोकांना त्रास देऊ नका. बनावट अकाउंट बनवून लोकांना त्रास देणारे हे गुन्ह्याच्या कक्षेत असल्याचे मानले जाते. जर कोणी तुमच्या बनावट खात्याविरुद्ध तक्रार दिली तर तुम्हाला तुरूंगात जावे लागू शकते.

व्हॉट्सअॅप हॅक करण्याची चूक कधीच करू नका. कारण व्हॉट्सअ‍ॅपला हॅक करण्याचा प्रयत्न करणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. व्हॉट्सअ‍ॅप सॉफ्टवेयर हॅक केल्याबद्दल कंपनीकडून आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कोणत्याही धर्माची किंवा उपासनास्थळाची हानी करण्यासाठी व्हाट्सएपवर द्वेषयुक्त मेसेज पाठवू नका. हे मेसेज तुम्हाला जेलवारी घडवू शकतात. तसेच, हिंसाचारास प्रवृत्त करण्यासाठी संवेदनशील विषयांवर बनावट बातम्या किंवा मल्टीमीडिया फाईल सेंड केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

हेही वाचा: ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय लॉक; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

गुंडगिरी करून व्हॉट्सअ‍ॅपवर अजिबात अश्लील मेसेज पाठवू नका. हे करणे धोकादायक ठरू शकते. जर तुमच्या मेसेजच्या आधारे कुणीतरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तर तुम्हाला जेलवारी घडू शकते. तसंच चुकीच्या आणि खोट्या पैशांचे व्यवहार करणारे मेसेज करू नका.

(avoid this type of messages while using whatsapp)

loading image
go to top