
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि टॅब्लेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, ऑनलाइन खरेदी, बँकिंग, आणि करमणुकीसाठी या उपकरणांवर अवलंबून राहणे सोपे झाले आहे. मात्र, यामुळे सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर, तुमचा पासवर्ड किती सुरक्षित आहे, याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.
1. 123456
2. password
3. lemonfish
4. 111111
5. 12345
6. 12345678
7. 123456789
8. admin
9. abcd1234
10. 1qaz@WSX
11. qwerty
12. admin123
13. Admin@123
14. 1234567
15. 123123
16. Welcome
17. abc123
18. 1234567890
19. india123
20. Password
2025 ची सुरुवात होताच सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सर्व मोबाइल आणि लॅपटॉप वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सामान्यतः वापरण्यात येणारे पासवर्ड हे हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य ठरतात. अशा कमजोर पासवर्डमुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते, तसेच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते.
सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा फर्म NordPass ने नुकताच एक अहवाल जाहीर केला, ज्यामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे 20 सर्वात कमजोर पासवर्ड उघड झाले आहेत. या अहवालात 2.5TB डेटा, ज्यामध्ये मालवेअर आणि डेटा ब्रीचमधून चोरीला गेलेले पासवर्ड समाविष्ट आहेत, त्याचा अभ्यास करण्यात आला. या पासवर्डची हॅकर्सकडून काही सेकंदांतच हॅकिंग होऊ शकते, असे स्पष्ट झाले आहे.
जर तुमचा पासवर्ड या यादीत असला तर तो त्वरित बदलणे गरजेचे आहे. सुरक्षित पासवर्ड तयार करताना पुढील गोष्टींचा विचार करा.
1. किमान 10 कॅरेक्टरचा पासवर्ड ठेवा.
2. पासवर्डमध्ये विशेष चिन्हे, आकडे, तसेच लहान आणि मोठ्या अक्षरांचा समावेश करा.
3. नाव, जन्मतारीख किंवा सहज ओळखता येईल अशी माहिती पासवर्डमध्ये टाळा.
सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित पासवर्डचा वापर हा पहिला टप्पा आहे. योग्य खबरदारी घेतल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवता येईल. त्यामुळे, आता तुमचा पासवर्ड तपासा आणि तुमची डिजिटल सुरक्षा सुनिश्चित करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.