बजाज Pulsar 250F लवकरच होणार लॉंच , काय असेल किंमत? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pulsar 250F

बजाज Pulsar 250F लवकरच होणार लॉंच, काय असेल किंमत? वाचा

बजाजच्या पल्सर बाईकचे देशभरात अनेक चहाते आहेत. पल्सर बाईक प्रेमींसाठी साठी लवकरच बजाज ऑटो (Bajaj Auto) भारतात नवीन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, ही नवीन बाईक पल्सर 250F (Pulsar 250F) असेल. सध्या इंटरनेटवर या बाईकचे फोटो लिक झाले असून त्यांना लोकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. असे मानले जाते की कंपनी ही बाईक लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करू शकते. आज आपण या बाईकची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

डिझाइन कसे असेल

या बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचे तर फोटो बघून असे लक्षात येते की बाईकला आधुनिक लूक देण्यासाठी एलईडी लाइटिंग देण्यात येईल. हे समोरच्या हेडलॅम्पवर शार्प दिसणाऱ्या एलईडी डीआरएलसह सिंगल एलईडी प्रोजेक्टर देण्यात येईल. दुचाकीच्या इतर ठळक वैशिष्ट्यांमध्ये बाईक स्पीडमध्ये चालवताना वाऱ्यापासून संरक्षणासाठी मोठी विंडस्क्रीन आणि रीअरव्यू मिरर देण्यात येतील. या बाईकमध्ये पुन्हा डिझाइन केलेल्या पॅनल्ससह मोठी बॉडी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच बाईकला ग्रीप आणि कंट्रोलसाठी जाड टायर्सचे कॉम्बिनेशन देखील दिले जाण्याची शक्यता आहे.

इंजिन, पॉवर आणि किंमत

मोटरसायकलमध्ये एक अगदी नवीन 250 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन एअर/ऑइल कूल्ड अपेक्षित आहे. हे इंजिन सध्याच्या 220F मॉडेलमध्ये मिळणाऱ्या पॉवरट्रेनपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. या व्यतिरिक्त अफवांनुसार इंजनची कार्यक्षमता वाढविण्यासाठी इंजिनमध्ये व्हीव्हीए (व्हेरिएबल व्हॅल्व्ह अॅक्ट्युएशन) तंत्रज्ञान देखील असू शकते.

हे तंत्रज्ञान सध्या यामाहाच्या YZF-R15 V3.0 बाईकमध्ये देखील आढळते. अद्याप या बाईकच्या लॉंचची वेळ निश्चित केलेली नाही, परंतु किंमत ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये उघड होऊ शकते. असे मानले जाते की बजाज कंपनी ही बाईक 1.40 लाख ते 1.50 (एक्स-शोरूम) च्या किंमतीत लॉन्च करू शकते.

हेही वाचा: मुलांचे आधार कार्ड दोनदा करा अपडेट, अन्यथा...

Web Title: Bajaj Auto To Launch Pulsar 250f Bike In India Soon Here Are The Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bajaj Auto