esakal | PUBG फॅन्ससाठी आनंदाची बातमी; बॅटलग्राउंडचा टीझर प्रदर्शित
sakal

बोलून बातमी शोधा

Battleground

पूर्व नोंदणी सुरू झाली असली तरी गेम कधी लाँच होणार याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

PUBG फॅन्ससाठी आनंदाची बातमी; बॅटलग्राउंडचा टीझर प्रदर्शित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : क्राफ्टन कंपनीने आपली नवीन गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पुढील महिन्यात लाँच करण्याची तयारी केली आहे. क्राफ्टनने याआधी गेमचा एक टीझर रिलिज केला असून तो सॅनहॉकसारखा दिसत होता. आता कंपनीने एक नवीन टीझर प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये जुन्या पब्जी मोबाईलच्या लोकप्रिय इरँगल सारखा दिसत आहे. गेल्या वर्षी भारतात पब्जीवर बंदी घालण्यात आली होती. कंपनी आता ही गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या नावाने सुरू करत आहे. (Battlegrounds Mobile India teaser release good news for PUB-G fans)

नव्या बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया या गेमची पूर्व नोंदणी गुगल प्ले स्टोअरवर १८ मे पासून सुरू झाली आहे. इरँगल मॅप हा पब्जी मोबाईलचा सर्वात जुना आणि सर्वात लोकप्रिय मॅप आहे. त्यामुळे हा नवीन मॅप कसा असेल याबाबत कोणतेही स्पष्टीकरण गेम डेव्हलपरने दिलं आहे.

गुगल प्ले स्टोअरवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, जे जुन्या गेममधील मॅपसारखेच दिसत आहेत. मीरामार मॅपचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नवीन बॅटलग्राउंड गेम ही पब्जीसारखीच असू शकते. यात काही भारतीय पद्धतीचे बदल केले जातील, असे कंपनीने याआधी म्हटले होते.

जुन्या पब्जीमधील लोकप्रिय मॅपचं नाव इरँगल होतं, या नव्या बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाच्या टीझरमध्ये मॅपचं नाव बदलण्यात आलं आहे. पूर्व नोंदणी सुरू झाली असली तरी गेम कधी लाँच होणार याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी १८ जूनला गेम लाँच करण्याची शक्यता आहे.

साय-टेकमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.