योगासनांमुळे आरोग्याचा खर्च येतो निम्म्यावर! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

जगभरात योगसाधनेचा प्रसार होत आहे. योग ही जीवनपद्धतीच असून, त्या मुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते. अर्थात, योगसाधनेचे केवळ एवढेच फायदे नसून, त्यामुळे आरोग्यावरचा 
खर्च ही जवळपास निम्म्याने कमी होत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. एकीकडे रुग्णालय, उपचाराचा खर्च गगनाला भिडत असताना, दुसरीकडे हा निष्कर्ष दिलासादायक म्हणावा लागेल.

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि बेन्सन हेन्‍री इन्स्टिट्यूटने संयुक्तपणे यासंदर्भात संशोधन केले. संशोधकांनी 2006 ते 2014 या काळात रिलॅक्‍सेशन, रिसपॉन्स, रेसिलन्सी प्रोग्रॅममध्ये (थ्री आरपी) भाग घेतलेल्या रुग्णांच्या नोंदी, तसेच त्यांच्यातील बदल तपासले. रिसर्च पेशंट डाटा रजिस्ट्रीमध्ये (आरपीडीआर) या रुग्णांची नोंद केली होती. या रुग्णांमधील उपचार, विविध चाचण्या आदींवरील खर्च सरासरी 43 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले. योगसाधनेच्या शिबिरातील सहभागानंतर चार ते सहा महिन्यांमध्ये रुग्णांमध्ये फरक पडण्यास सुरवात झाली. भारतीय प्राचीन परंपरेतील योगसाधना तसेच ध्यानामुळे शिथिलीकरण होऊन ताण, चिंता आणि नैराश्‍य दूर जाते. त्याचप्रमाणे, मानसिक शांती अनुभवता येते. नियमित योगसाधनेमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाबावरही चांगला परिणाम होतो. त्यामुळेच, आजारी पडण्याची शक्‍यता घटून, आरोग्यावरचा खर्च ही कमी होतो, असे संशोधकांचे मत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: because of Yoga health money half spending!