5G Smartphones : 'हे' आहेत 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट 5G स्मार्टफोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphones

5G Smartphones : 'हे' आहेत 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट 5G स्मार्टफोन

25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा 5G स्मार्टफोन खरेदी कऱण्याचा विचार करत असाल तर अनेक चांगले स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत.

Redmi K50i 5G: या फोनमध्ये Mediatek Dimensity 8100 प्रोसेसर देण्यात आला आहे. 6.6-इंच स्क्रीनसह फोनमध्ये Full HD+ डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 MP मेन रियर कॅमेरा, 8 MP दुसरा अल्ट्रा वाइड आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5080 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये आहे.

Samsung Galaxy M53 5G: या सॅमसंग फोनमध्ये Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये Full HD+ Super AMOLED डिस्प्ले, 120 HZ रिफ्रेश रेट आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह 6.7-इंच स्क्रीन आहे. यात 108 MP मेन रियर कॅमेरा, 8 MP दुसरा, 2 MP तिसरा आणि 2 MP चौथा कॅमेरा आहे. याशिवाय 32 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 5,000 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 6 जीबी रॅम मॉडेलची किंमत 21,999 रुपये आणि 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत 23,999 रुपये आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G: Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर या फोनमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये Full HD+ डिस्प्ले, 120 HZ रिफ्रेश रेट आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 6.59-इंच स्क्रीन आहे. यात 64 MP मेन रियर कॅमेरा, 2 MP दुसरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे. फोनच्या 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे आणि 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे.

Realme 9 Pro 5G: या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये Full HD+ डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 6.6-इंच स्क्रीन आहे. यात 64 MP मेन रियर कॅमेरा, 8 MP दुसरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे. फोनच्या 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 19,900 रुपये आहे आणि 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 20,990 रुपये आहे.

iQOO Z6 Pro 5G: या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.44-इंच स्क्रीनसह AMOLED डिस्प्ले, 90 HZ चा रिफ्रेश रेट आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 64 MP मेन रियर कॅमेरा, 8 MP दुसरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 4700 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 6 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रुपये आणि 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे.