Best Gift For Bhaubeej: तुमच्या बहिणीला गीफ्ट द्या 'हे' बेस्ट गॅजेट्स; किंमत 1500 रुपयांपेक्षा कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Gift For Bhaubeej gift your sister these great gadgets with price less than rs 1500

Best Gift For Bhaubeej: तुमच्या बहिणीला गीफ्ट द्या 'हे' बेस्ट गॅजेट्स; किंमत 1500 रुपयांपेक्षा कमी

दिवाळीनंतर ज्या सणाची प्रत्येकजण वाट पाहत असतो तो म्हणजे भाऊबीज. भाऊबीजच्या दिवशी आपल्या भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचे याचाही विचार तुम्ही करत असाल. तर आज आम्ही तुम्हाला अशा गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत जे गिफ्टिंगसाठी उपयुक्त आहेत आणि किंमतीतही स्वस्त आहेत.

Lava Probuds N11- भारतीय कंपनी लावाचा हा नेकबँड फायरफ्लाय ग्रीन, काई ऑरेंज आणि पँथर ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये येतो. याशिवाय कंपनीने ड्युअल हॉल स्विच फंक्शन डॅश स्विच, टर्बो लेटन्सी, प्रो गेम मोड, नॉइज कॅन्सलेशन सारखे फीचर्स देखील दिले आहेत. यात 280 mAh बॅटरी आहे जी 42 तासांपर्यंत खेळण्याचा वेळ देते. याशिवाय, हे 10 मिनिटांत चार्ज केल्यानंतर 13 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देते. या नेकबँडमध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वरून 1499 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

हेही वाचा: WhatsApp Down: व्हॉटसअ‍ॅप डाउन झालं अन् नेटकरी सुसाट; Viral Memes एकदा पाहाच

Croma Truly Wireless Earbuds- टाटा कंपनीच्या क्रोमा ब्रँडचे हे इयरबड्स क्रोमाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून 749 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इयरबड्स आणि केसच्या कॉबिनेशनने वापरले तर ते 15 तासांपर्यंत प्लेटाईम देऊ शकतात. याशिवाय, एका चार्जवर ते 3 तास चालू शकतात. boAt Stone Bluetooth Speaker- ब्लूटूथ स्पीकरबद्दल बोलायचे झाल्यास, boAt stone 190 5W ब्लूटूथ स्पीकर कमी किमतीत एक अतिशय चांगला पर्याय आहे. यात 4 तासांची बॅटरी आणि 1.5 तास चार्जिंग वेळ देण्यात आली आहे. हा बँड वॉटर रेजिस्टंट आहे, ज्यासाठी त्याला IPX7 रेट देखील केले गेले आहे. हा 5W स्पीकर आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून 999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

हेही वाचा: पुराव्याशिवाय पतीला 'मद्यपी आणि व्यभिचारी' म्हणणे क्रूरता : मुंबई हायकोर्ट

TAGG Verve NEO Smartwatch- या स्मार्टवॉचची किंमत 1,499 रुपये आहे. याला 10 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा HD डिस्प्ले आहे. ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट मॉनिटर अशी वैशिष्ट्ये या घड्याळात उपलब्ध आहेत. हे घड्याळ वॉटर प्रूफ आहे ज्यासाठी त्याला IP68 रेट देखील केले गेले आहे. हे Amazon वर 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Syska 10000 mAh Power Bank- पॉवर बँक ही एक गरज आहे. Syska 10000 mAh पॉवर बँक ही कमी किमतीत उपलब्ध असलेली सर्वोत्तम पॉवर बँक आहे. त्याची किंमत 799 रुपये आहे. ही 10,000 mAh क्षमतेची पॉवर बँक आहे. यात 2 पोर्ट दिले आहेत. ही स्मार्टफोनसह टॅबलेट देखील चार्ज करू शकते.

टॅग्स :Diwali Festival