Heater for Home
Heater for HomeeSakal

Heater for Home : यंदाच्या हिवाळ्यात घराला ठेवा गरम; स्वस्तात मिळतायत मस्त हीटर! पाहा बेस्ट ऑप्शन

Room Heaters : अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर अगदी एक हजार रुपयांपासून चांगले हीटर उपलब्ध आहेत.

Amazon Home Heaters : दिवाळी संपून आता थंडीची चाहूल लागली आहे. थोड्याच दिवसांमध्ये सध्याच्या गुलाबी थंडीचं रुपांतर अगदी बोचऱ्या थंडीमध्ये होईल. त्यामुळे लवकरच बाजारातील हीटर, गीझर अशा वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे आतापासूनच तुम्ही स्वस्तात मस्त असे हीटर खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं.

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर अगदी एक हजार रुपयांपासून चांगले हीटर उपलब्ध आहेत. तुमचं घर, किंवा रुम मोठी असेल तर तुम्हाला थोडा मोठा हीटर घ्यावा लागेल. हे हीटरही पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Heater for Home
Geyser Buying Guide : नवीन गिझर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या; अन्यथा करावा लागेल पश्चाताप

बजेट हीटर

छोट्या रूमसाठी अगदी एक हजार रुपयांच्या बजेटमध्ये छोटे हीटर उपलब्ध आहेत. Bajaj Flashy हा एक हजार वॅट क्षमतेचा हीटर अमेझॉनवर केवळ 998 रुपयांना उपलब्ध आहे. याला 4.1 स्टार अमेझॉन रेटिंग आहे. तसंच, गेल्या महिनाभरात सुमारे 1 हजार लोकांनी याची खरेदी केली आहे. Activa Heat Max या हीटरची किंमत 999 रुपये आहे. याची क्षमता सुमारे 2000 वॅट आहे.

Bajaj Deluxe हा 2000 वॅट क्षमतेचा हीटर अमेझॉनवर 1,298 रुपयांना उपलब्ध आहे. Orpat OCH-1220 या 2000 वॅट क्षमतेच्या हीटरला तब्बल 46 हजारांहून अधिक रिव्ह्यूज आहेत. याची किंमत 1,175 रुपये आहे. तर Amazon Brand असलेल्या Solimo या हीटरची किंमत 1,135 रुपये आहे. याला देखील 20 हजारांहून अधिक रिव्ह्यूज आहेत. (Tech News)

Heater for Home
Room Heater : रूम हीटर खरेदी करण्याचा प्लॅन करता आहात? या गोष्टी लक्षात ठेवा, होईल पैशांची बचत

Crompton Insta Comfort हा 2000W क्षमतेचा हीटर अमेझॉनवर 1,650 रुपयांना उपलब्ध आहे. Havells कंपनीचे हीटर दीड ते साडेतीन हजार रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. 800W ते 2000W या रेंजमधील हे हीटर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com