
थोडक्यात
स्वस्त किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स रोजच्या प्रवासासाठी फायदेशीर ठरतात.
बजाज प्लेटिना, होंडा शाइन आणि टीव्हीएस स्पोर्ट या बाईक्स कमी खर्चात जास्त चालतात.
देखभाल खर्च कमी आणि मजबूत बॉडी असलेल्या बाईक्स ऑफिस किंवा कॉलेजसाठी उत्तम पर्याय आहेत.
भारतीय बाजारपेठेत दुचाकींना मोठी मागणी आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे बाईक आणि स्कूटर दोन्हीही रोजच्या गर्दीत सर्वोत्तम ठरतात. आणखी एक कारण म्हणजे देशात, दुचाकी स्वस्त, हलक्या आणि कमी जागेतूनही मार्ग काढू शकतात. भारतीय बाजारात कमी किमतीच्या आणि चांगले मायलेज देणाऱ्या अनेक दुचाकी उपलब्ध आहेत. आता अधिक पर्यायांमुळे कोणती बाईक खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.