Android apps and games : गुगलने जाहीर केले २०२२ चे सर्वोत्तम अँड्रॉइड अ‍ॅप्स अन् गेम्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Android apps and games

Android apps and games : गुगलने जाहीर केले २०२२ चे सर्वोत्तम अँड्रॉइड अ‍ॅप्स अन् गेम्स

Best of Play 2022 Awards for The Best Apps and Games : गुगल प्लेने 'बेस्ट ऑफ प्ले २०२२' पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार भारतातल्या सर्वोत्तम अ‍ॅप्स अन् गेम्सला देण्यात येणार आहेत. फोन, टॅब्ज आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अशा सर्वच व्यासपिठावरच्या अ‍ॅप्स साठी आहे.

या पुरस्कारांनी गुगल प्ले वरच्या सर्वोत्कृष्ठ अ‍ॅप्स आणि गेम्सला आणि डेव्हलपर्सना गौरविण्यात आलं. गुगलच्या संपादकीय विभागाने ग्राहकांच्या पसंतीचे आणि अपेक्षा पुर्ण करणाऱ्या अ‍ॅप्स आणि गेम्सची यात निवड केली आहे.

या अ‍ॅप्स आणि गेम्सच्या वापर कर्त्यांना वैयक्तीक प्रगती, रोजच्या जीवनातील कामं, क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन्स, व्यावसायिक प्रेरणा अशा विविध अंगांनी हे विजेते ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेले आहेत. विशेष म्हणजे यातले बरेचसे अ‍ॅप्स किंवा गेम्स हे भारतातल्या स्थानिक लोकांनी डेव्हलप केले आहेत. ही अजून एक प्रेरणादायी गोष्ट असल्याच गुगलने सांगितलं आहे. यातून लोक आपली सर्जनशीलता दाखवत आहेत. ध्येयाच्या दिशेने, जिंकण्यासाठी वाटचाल करत आहेत ही वाखणण्या जोगी गोष्ट असल्याचं गुगलने सांगितलं आहे.

टॅग्स :Google