वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स | Smartphone Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone

Smartphone Tips: वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Smartphone Battery Tips: स्मार्टफोनचा वापर आपण दिवसभर वेगवेगळ्या कामासाठी करतो. मात्र, फोन दिवसभर वापरण्यासाठी यात पॉवरफुल बॅटरी असणे देखील गरजेचे आहे. सध्या फोनमध्ये ५००० एमएएच, ६००० एमएएच बॅटरी मिळते. फोन जुना झाला की बॅटरी लाइफवर याचा परिणाम होतो. परंतु, तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून बॅटरी लाइफ वाढवू शकता.

हेही वाचा: Broadband Plans: 100Mbps स्पीडने वापरा अनलिमिटेड इंटरनेट, 'हे' आहेत सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स

ब्राइटनेस ठेवा कमी

फोनच्या ब्राइटनेसचा देखील परिणाम बॅटरीवर होतो. ब्राइटनेस कमी असल्यास बॅटरी लवकर संपणार नाही. तुम्ही फोनच्या ब्राइटनेसला ऑटोवर देखील सेट करू शकता.

या सेटिंग्स ठेवा बंद

गरज नसल्यास तुम्ही फोनच्या GPS, ब्लूटूथ आणि WiFi सेटिंगला बंद करू शकता. यामुळे बॅटरी लाइफ वाढण्यास मदत होईल. तसेच, मोबाइल डेटादेखील बंद ठेवावा. यामुळे बॅकग्राउंड अ‍ॅप्स डेटाचा वापर करणार नाहीत.

बॅकग्राउंड अ‍ॅप्स

फोनमध्ये काही अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये सतत काम करतात. याचा परिणाम फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. तुम्ही या अ‍ॅप्सला बंद करून बॅटरी लाइफ वाढवू शकता. फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन बॅकग्राउंडमध्ये काम करणाऱ्या अ‍ॅप्सला बंद करता येईल.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

स्क्रीन टाइम करा कमी

फोनचा स्क्रीम टाइम जास्त असल्यास तो कमी करा. यामुळे बॅटरी लवकर ड्रेन होणार नाही. तुम्ही स्क्रीन टाइम ३० सेकंद निवडू शकता. तसेच, वायब्रेशनच्या इंटेसिटीला देखील कमी करा.

लाइव्ह वॉलपेपर वापरू नका

अनेकदा आपण फोनच्या स्क्रीनवर लाइव्ह वॉलपेपर ठेवतो. हे वॉलपेपर बॅटरीचा जास्त वापर करतात. त्यामुळे फोनच्या स्क्रीन साधा वॉलपेपर ठेवावा. तसेच, फोनला चार्ज करताना ओरिजिनल चार्जरचाच वापर करावा. तुम्ही जर दुसऱ्या कंपनीच्या चार्जरचा वापर करत असाल तर बॅटरी खराब होईल.

हेही वाचा: Smartphone Offer: Oppo ची धमाकेदार ऑफर, ९९९ रुपयात मिळतोय २८ हजारांचा फोन; पाहा डिटेल्स

टॅग्स :mobilephoneBattery