
सावधान ! Googleवर या गोष्टी चुकूनही शोधू नका; जावे लागेल तुरुंगात
मुंबई : तुम्ही जर प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगलची मदत घेत असाल, तर आता थोडं सावध राहा, नाहीतर तुरुंगात जावं लागू शकतं. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुरुंगाच्या जाण्यास भाग पाडू शकतात. चला तर मग आज जाणून घेऊ या की त्या कोणत्या गोष्टी आहेत.
हेही वाचा: what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?
बॉम्ब कसा बनवायचा
बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर चुकूनही सर्च करू नका. बॉम्ब किंवा त्याच्याशी संबंधित काहीही सर्च केल्यास तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. तुम्ही गुगलवर अशी एखादी गोष्ट सर्च करताच, तुमचा आयपी अॅड्रेस थेट सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचेल. यानंतर सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकतात.
हेही वाचा: Cyber fraud : WhatsAppवरील हे संदेश आहेत फसवे; होईल आर्थिक लूट
गर्भपाताबद्दल शोध घेणे
गर्भपाताशी संबंधित माहिती गुगलवर सर्च केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. भारतात सरकारने यासाठी कडक कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे. डॉक्टरांच्या मान्यतेनंतरच हे शक्य आहे, म्हणून पुढच्या वेळी असे काहीही शोधण्यापूर्वी विचार करा.
गुगलवर तुमचा ईमेल आयडी शोधू नका
गुगलवर तुमचे ईमेल लॉगिन कधीही शोधू नका. असे केल्याने तुमचे खाते हॅक होऊ शकते आणि पासवर्ड लीक होऊ शकतो.
Web Title: Beware Dont Accidentally Search For These Things On Google You Have To Go To Jail
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..