

esakal
Cyber Security Tips : अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन ट्रिक वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. रिमोट अॅक्सेस ॲप्स (Remote Access Apps) हे स्कॅमर्ससाठी एक प्रभावी साधन बनले असून या ॲप्सचा वापर करून ते तुमच्या फोनवर पूर्ण ताबा मिळवू शकतात. काही लोकप्रिय ॲप्स जी वास्तविक तांत्रिक मदतीसाठी डिझाइन केली आहेत, ती आता फसवणुकीचे मुख्य माध्यम ठरत आहेत.