gadget | Apple युजर्सना मोठा धक्का ! iPhone 14च्या लॉन्चबाबत ही माहिती आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iphone

Apple युजर्सना मोठा धक्का ! iPhone 14च्या लॉन्चबाबत ही माहिती आली समोर

मुंबई : Apple ची नवीन सीरीज iPhone 14 लाँच होण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. जगभरातील चाहते आयफोन 14 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. Apple iPhone 14 चार प्रकारांमध्ये ऑफर केला जाऊ शकतो - जे iPhone 14, 14 Plus, 14 Pro, 14 Pro Max असतील. म्हणजेच यावेळी मिनी मॉडेल लाँच होणार नाही.

अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. असे दिसते आहे की आयफोन 14 मॅक्स स्मार्टफोनच्या लॉन्चला विविध कारणांमुळे विलंब होऊ शकतो.

हेही वाचा: Nokia C21 Plus : एकदाच चार्ज करा आणि तीन दिवस वापरा

iPhone 14 सीरीज पुढील महिन्यात सप्टेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च केली जाऊ शकते. दरम्यान, अशीही बातमी समोर येत आहे की, या लेटेस्ट सीरीजचे मॉडेल, iPhone 14 Max, अजून लॉन्च होणार नाही. म्हणजेच हे मॉडेल नंतर लॉन्च केले जाईल. आयफोन 14 मॅक्ससाठी पॅनेल शिपमेंट्स खूप मागे आहेत. iPhone 14 Pro Max चा पुरवठा iPhone 14 Max च्या तिप्पट आहे.

गेल्या वर्षीच्या फोनच्या तुलनेत iPhone 14 ची किंमत जवळपास 10,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. भारतात $100 ची किंमत सुमारे रु.8,000 आहे, परंतु ऍपल साधारणपणे $1 ला रु.100 असे दर देते. त्यामुळे किंमतीतील वाढ 10,000 रुपयांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Jio : मोफत मिळत आहे २ हजार रुपयांपर्यंतची रिचार्ज ऑफर

आयफोन 13 सध्या भारतात अनेक वेबसाइट्सवर 79,990 रुपयांपासून विकला जात आहे. iPhone 14 ची किंमत 90,000 च्या जवळपास असू शकते. तथापि, कंपनी या फरकाने किंमत वाढवेल अशी अपेक्षा नाही.

Web Title: Big Shock To Apple Users This Information About The Launch Of Iphone 14 Came To The Fore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :applephoneApple iphone
go to top