iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

biggert discount on iphone 13 iphone 12 mini and iphone 11 via flipkart big billion days sale check offers

iPhone 13, 12 Mini अन् 11 वर मिळतेय बंपर सूट; फ्लिपकार्टने जाहीर केल्या किंमती

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) 23 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. या आठवडाभर चालणाऱ्या सेलमध्ये फ्लिपकार्ट विविध स्मार्टफोन्सवर विविध ऑफर आणि डिस्काउंट देणार आहे. फ्लिपकार्टने सेलच्या अगोदर स्मार्टफोन डील्सची माहिती देणे सुरू केले आहे. लेटस्ट टीझरमध्ये फ्लिपकार्टने सेल दरम्यान आयफोन 13 वर देण्यात येणाऱ्या डिल्सबद्दल माहिती देण्यात आली आहे.

iPhone 14 लाँच केल्यानंतर Apple ने अधिकृतपणे iPhone 13 च्या किमतीत कपात केली आहे, पण सेलमुळे तुम्ही कमी किमतीत तो खरेदी करू शकाल. याशिवाय Flipkart ने iPhone 12 Mini आणि iPhone 11 वर उपलब्ध डील देखील उघड केल्या आहेत. जर तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आयफोन 13, आयफोन 12 मिनी आणि आयफोन 11 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल सर्व काही येथे जाणून घ्या..

iPhone 13 ची किंमत 49,990 रुपयांपासून सुरू

Apple ने या महिन्याच्या सुरुवातीला iPhone 13 ची किंमत बदलली आहे. फोनचा 128GB व्हेरिएंट अधिकृतपणे Apple India वेबसाइटवर 69,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पण Flipkart आयफोन 13 आणखी वाजवी दरात ऑफर करेल. ई-कॉमर्स कंपनीने कंन्फर्म केले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान iPhone 13 ची किंमत 49,990 रुपयांपासून सुरू होईल.

आयफोन 11 ची सुरुवातीची किंमत 30000 रुपयांपेक्षा कमीत

टीझरमध्ये असेही दिसून आले आहे की सेल दरम्यान iPhone 11 ची किंमत 30000 रुपयांपेक्षा कमी असेल. मात्र, कंपनीने अद्याप नेमकी किंमत जाहीर केलेली नाही. Flipkart बिग बिलियन डेज सेल दरम्यान iPhone 12 Mini हा 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल. मात्र, कंपनीने अद्याप नेमकी किंमत जाहीर केलेली नाही. बंद होण्यापूर्वी iPhone 12 Mini अधिकृतपणे 59,900 रुपयांमध्ये उपलब्ध होता परंतु सध्या Flipkart वर 55,359 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसाठी लिस्टेड आहे, जी त्याच्या 64GB व्हेरियंटची किंमत आहे.

Apple iPhone 12 Mini हे 5.4-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह एक लहान स्क्रीन डिव्हाइस आहे. हा स्मार्टफोन न्यूरल इंजिन प्रोसेसरसह A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे. फोनच्या मागे ड्युअल 12-मेगापिक्सेल कॅमेरा आणि समोर 12-मेगापिक्सेल ट्रूडेप्थ सेन्सर आहे. तो निळा, हिरवा, पांढरा, लाल आणि काळा रंगात उपलब्ध आहे.