Bill Gates : शेतीमध्ये 'एआय'च्या वापराबद्दल गेट्स-पटनाईक यांच्यात चर्चा; ‘अमा कृषी चॅटबॉट’ची केली पाहणी

Naveen Patnaik : ‘नवीन निवास’ येथे झालेल्या भेटीत त्यांनी स्वयंसहाय्यता गट (बचत गट), झोपडपट्टी व्यवस्थापन आणि डिजिटल बदलांवर देखील चर्चा केली, असे सांगण्यात आले.
Bill Gates Meets Naveen Patnaik
Bill Gates Meets Naveen PatnaikeSakal

Bill Gates Discuss AI in Farming with Patnaik : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी बुधवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली. ‘नवीन निवास’ येथे झालेल्या भेटीत त्यांनी स्वयंसहाय्यता गट (बचत गट), झोपडपट्टी व्यवस्थापन आणि डिजिटल बदलांवर चर्चा केली, असे सांगण्यात आले.

बिल गेट्स (Bill Gates) हे काल ओडिशात पोहोचले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि विकास उपक्रमांवर ओडिशा सरकारशी सहकार्य कराराविषयी चर्चा करणे हे त्यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. गेट्स यांनी आज सकाळी कृषी भवनला भेट दिली. तेथे त्यांनी ‘अमा कृषी एआय चॅटबॉट’ची पाहणी केली. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नवीन माहिती मिळणे यामुळे सोपे झाले आहे. कृषी सचिव अरविंद पाधी यांनी गेट्स यांचे स्वागत केले.

‘‘कृषी भवन केंद्रातील सरकारी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर करतात. कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण विभाग आणि मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संवर्धन विभाग २०१७ पासून डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेत नावीन्य आणण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनशी सहकार्य करीत आहेत,’’ असे पाधी यांनी सांगितले. (AI Technology in Farming)

Bill Gates Meets Naveen Patnaik
Bill Gates-Dolly Chaiwalla Video : नागपूरच्या डॉलीचे बिल गेट्स सुद्धा झाले फॅन, लुटला डान्सिंग चहाचा आनंद

‘मिशन शक्ती’च्या सचिव सुजाता राऊत यांनी गेट्स यांना बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला उत्पादनांची माहिती त्यांना दिली. त्याआधी बिल गेट्स यांनी मा मंगल वस्तीला भेट देऊन ओडिशा सरकारच्या ‘जागा मोहीम’ (झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी योजना) आणि ‘मुक्ता’ (शहरी गरिबांसाठी स्थानिक रोजगार संधी योजना) आदी योजनांची माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com