Smart Ring : नॉईज की बोट? कोणत्या कंपनीची स्मार्ट रिंग आहे बेस्ट? जाणून घ्या फीचर्स

boAt Smart Ring : बोट कंपनीने आपल्या स्मार्ट रिंगची किंमत जाहीर केली आहे.
Smart Ring
Smart RingeSakal
Updated on

स्मार्ट वेअरेबल्समध्ये आता स्मार्टवॉचचं मार्केट डाऊन होण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे, दोन मोठ्या कंपन्यांनी भारतात आपल्या स्मार्ट रिंग्स लाँच केल्या आहेत. Noise कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली Luna ही स्मार्ट रिंग लाँच केली होती. त्यानंतर आता boAt कंपनीने Smart Ring लाँच केली आहे.

बोट स्मार्ट रिंग

बोट कंपनीने आपली स्मार्ट रिंग तीने साईजमध्ये लाँच केली आहे. 7,9 आणि 11 म्हणजेच अनुक्रमे 17.40 mm, 19.15 mm आणि 20.85 mm या साईजमध्ये रिंग्स उपलब्ध असतील. या रिंगमध्ये स्टेप काउंटर, कॅलरी काउंटर, डिस्टन्स ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, वर्क आउट ट्रॅकिंग असे कित्येक फीचर्स देण्यात आले आहेत.

Smart Ring
Smart TV Tips : तुमचा स्मार्ट टीव्ही स्लो झालाय का? या टीप्स वापरा आणि झटक्यात टीव्ही फास्ट करा

सोबतच, boAt Smart Ring मध्ये बॉडी टेम्परेचर सेन्सर, SpO2 मॉनिटर, स्लीप मॉनिटर, पीरिएड ट्रॅकिंग, नोटिफिकेशन अलर्ट असे फीचर्स देखील मिळतात. वॉटर रझिस्टंससाठी याला 5ATM रेटिंग मिळाली आहे. या रिंगच्या मदतीने यूजर्स गाणी प्ले आणि पॉझ करू शकतात असाही दावा कंपनीने केला आहे. सोबतच, फोटो काढण्यासाठी बटण म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. ही रिंग boAt Ring App सोबत काम करते. (Tech News)

नॉईज लूना स्मार्ट

Noise Luna Smart ही रिंग वजनाला अगदी हलकी आणि आकाराने अगदी स्लिम आहे. ही रिंग केवळ 3mm जाड आहे. फायटर जेट ग्रेटमध्ये वापरण्यात आलेल्या टायटेनियम धातूचा वापर यात करण्यात आला आहे. सोबतच यावर असणारी विशेष कोटिंग हिला स्क्रॅचप्रूफ आणि वॉटर रेझिस्टंट बनवते. या रिंगच्या आतल्या बाजूला इन्फ्रारेड सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

Smart Ring
Smartphone Recording : तुमचा स्मार्टफोन गुपचूप रेकॉर्ड करतोय तुमचं बोलणं; लगेच बंद करा ही सेटिंग!

या रिंगमध्ये हार्ट रेट ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन (SpO2) सेन्सर, PPG सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, एक्सिस एक्सेलरोमीटर असे फीचर्स देण्यात आले आहेत. या रिंगमध्ये 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फिलिप्स या कंपनीसोबत मिळून नॉईजने ही स्मार्ट रिंग बनवली आहे.

किती आहे किंमत?

या दोन्ही रिंग्समध्ये जवळपास सारखे फीचर देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी एक निवडण्यासाठी लुक आणि किंमत या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. बोटच्या स्मार्ट रिंगची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, नॉईजच्या स्मार्ट रिंगची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अर्थात, कंपनीने याची बुकिंग अमाउंट 2,000 रुपये एवढी ठेवली आहे.

Smart Ring
Parkinson's : स्मार्टवॉच ठरणार वरदान! लक्षणे दिसण्याच्या सात वर्षांपूर्वीच मिळणार पार्किन्सनचे संकेत; अभ्यासात माहिती समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com