बोअरवेलमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेचे तंत्रज्ञान

borewell rescue robot
borewell rescue robot

मुंबई : बांगलादेशमध्ये 2006मध्ये एक मुलगा 600 फूट बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. त्या मुलाला वाचवण्यात अपयश आले. अशा घटनांवर आधारित उपाय म्हणून बांगलादेशच्या अहसनउल्लाह विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्व्हेलन्स आणि रेस्क्‍यू रोबो तयार केला आहे.

कॅमेरा, रोबोटिक आर्म आणि डेटाच्या माध्यमातून ते ऑपरेट करणाऱ्याशी संवाद हे या रोबोचे वैशिष्ट्य आहे. आयआयटी टेकफेस्टच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात हा रोबो मांडण्यात आला होता.


कोणत्याही पाईपच्या माध्यमातून ऑपरेट करता येणे हे या रोबोचे वैशिष्ट्य आहे. रोबोच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाईपच्या आतील माहिती ऑपरेटरला स्क्रिनवर पाहता येणे शक्‍य आहे. पाईप स्वच्छ करणे, पडलेली वस्तू शोधणे यासारख्या गोष्टी रोबोच्या माध्यमातून शक्‍य आहेत. रोबोसाठीच्या शाफ्टपासून ते त्याच्या चाकापर्यंत आवश्‍यकतेनुसार सर्व गोष्टी बदलणे शक्‍य आहे. सध्याचा रोबो आठ ते दहा इंची पाईपमध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे, तर रोबो आर्मच्या मदतीने 30 किलोपर्यंत वजन उचलण्याची त्याची क्षमता आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण रोबो हा वॉटरप्रूफ आहे. टाकाऊ गोष्टींपासून तयार करण्यात आला आहे. पाईप वेल्डिंग, देखभाल दुरुस्ती यासारख्या गोष्टींसाठीही रोबो उपयुक्त आहे. ऑप्टिकल फायबर तसेच पाईपमध्ये होणारी गळती आदी गोष्टीही रोबोच्या मदतीने तपासणे शक्‍य आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत मानवी जीव वाचवणे या रोबोतून शक्‍य होईल, असा आमचा विश्‍वास आहे. त्यासाठी या प्रोटोटाईप मॉडेलचे आणखी सक्षम मॉडेल विकसित करणे गरजेचे असल्याचे मत या टीमचा प्रमुख रोशन हलीलने व्यक्त केले. फरीहा मौली, अनिहा रझा, हिदिता महबुल आदी टीमने एक महिन्यामध्ये टाकाऊ गोष्टींचा वापर करत हा रोबो तयार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com