गुगलला 2.4 अब्ज युरोचा दंड

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

विश्‍वासभंग केल्याने युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाची कारवाई

ब्रुसेल्स : विश्‍वासभंग केल्याबद्दल गुगल कंपनीला युरोपीय समुदायाने तब्बल 2.4 अब्ज युरोचा विक्रमी दंड मंगळवारी ठोठावला. याआधी अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी इंटेलला 1.06 अब्ज युरोचा दंड युरोपीय समुदायाने केला होता.

विश्‍वासभंग केल्याने युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाची कारवाई

ब्रुसेल्स : विश्‍वासभंग केल्याबद्दल गुगल कंपनीला युरोपीय समुदायाने तब्बल 2.4 अब्ज युरोचा विक्रमी दंड मंगळवारी ठोठावला. याआधी अमेरिकेतील चिप निर्माती कंपनी इंटेलला 1.06 अब्ज युरोचा दंड युरोपीय समुदायाने केला होता.

या कारवाईविषयी बोलताना युरोपीय समुदायाच्या स्पर्धा आयोगाच्या प्रमुख मार्गारेट वेस्टागेर म्हणाल्या, की गुगलने बाजारपेठेतील आघाडीच्या स्थानाचा गैरफायदा घेतला. जगातील सर्वांत प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने स्वत:च्या विक्रीसेवांना सर्चमध्ये झुकते माप दिले आहे. युरोपीय समुदायाच्या विश्‍वासभंगविरोधी कायद्यांतर्गत हे बेकायदा ठरते. गुणवत्ता आणि नावीन्य या निकषावर गुगलने अन्य कंपन्यांना स्पर्धा करण्याची संधी यामुळे डावलली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे युरोपमधील ग्राहकांना योग्य आणि नावीन्यपूर्ण सेवा मिळण्यापासून वंचित ठेवले. या प्रकरणी गुगलविरोधात 2010 मध्ये तीन खटले दाखल झाले होते.

स्पर्धा आयोगाने सांगितल्यानुसार, गुगलने व्यावसायिक पद्धतीत बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. गुगलला झालेला दंड हा कंपनीच्या गेल्या वर्षीच्या एकूण महसुलाच्या दहा टक्के आहे. गुगलने गुगल शॉपिंगला प्राधान्य देण्याची पद्धत बंद करावी, असे स्पर्धा आयोगाने म्हटले आहे.

बड्या अमेरिकी कंपन्यांवरही कारवाई?
स्टारबक्‍स, ऍपल, ऍमेझॉन आणि मॅकडोनाल्ड या बड्या अमेरिकी कंपन्यांविरोधातही युरोपीय समुदायात खटले दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची होण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गुगलवर कारवाई होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brussels news google fine