

380 days validity and free Rs 1 lakh accident insurance in just Rs 2449
Sakal
खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या रिचार्ज प्लॅन्सच्या स्पर्धेत सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत फायदेशीर वार्षिक ऑफर आणली आहे. कंपनीच्या २,४४९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर आता ३६५ ऐवजी तब्बल ३८० दिवसांची वैधता मिळत आहे. इतकंच नाही, तर या रिचार्जसोबत ग्राहकांना १ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देखील दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे.