esakal | 169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा बीएसएनएल-पतंजली प्लॅन बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL

169 रुपयांत देशभर Unlimited बाेला, राेज मिळवा दाेन जीबी डाटा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) (BSNL) पुन्हा एकदा रामदेव बाबा यांच्या समवेत सुरु केलेला "पतंजली बीएसएनएल सिमकार्ड' (patanjali bsnl plan) बाजारात आणले आहे. ग्राहकांना केवळ 169 रुपयांत देशभर अमर्यादित बाेलण्याची सवलत (unlimited free calling) या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. याबराेबरच प्रतिदिन दोन जीबी इंटरनेट डेटा (internet data) आणि 100 एसएमएसची (100 sms) सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील (telecom industry) वाढत्या स्पर्धेस पुन्हा एकदा पतंजली बीएसएऩएल सिमकार्डच्या माध्यमातून बीएसएनएलने टक्कर देण्याची तयारी केल्याची या योजनेच्या सवलतीमधून दिसतयं. (bsnl-introduce-patanjali-plan-unlimited-free-calling-satara-trending-news)

"बीएसएनएल'ने सन 2018 मध्ये "पतंजली बीएसएनएल' योजनेअंतर्गंत हरिद्वार येथे बीएसएनएल आणि पतंजली संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेची मुहूर्तमेढ रोवली हाेती. त्यानंतर या याेजनेतील मिळणारे फायदे लक्षात घेऊन ग्राहकांनी पतंजली प्लॅनला भरभरुन प्रतिसाद दिला हाेता.

हेही वाचा: ज्यानं जगाला हसवलं, त्या 'श्लितजी'ला पालकांनी घराबाहेर हाकललं

कालानंतराने खासगी कंपन्यांच्या विविध प्लॅनमुळे आणि मिळणा-या सवलतींमुळे बीएसएनएलचा ग्राहक अन्यत्र वळला. परिणामी बीएसएनएलने त्यांच्याकडील विविध याेजना स्थगीत केल्या. काही बंदही केल्या. आता पुन्हा ग्राहक वर्गास आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने चंग बांधला आहे.

पतंजलीच्या माध्यमातून बीएसएनएलने देशभर अमर्यादित कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा असलेला पतंजली प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे माेफत पतंजली पीआरबीटी (फ्री रिंग टाेन) योजना उपलब्ध आहे. ही योजना तीन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणारे प्रीपेड स्वरूपाचे सिमकार्डला 169 रुपयांत 30 दिवस, 930 रुपयांत सहा महिने तसेच 1859 रुपयांत 365 दिवसांची वैधता मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत स्वाभिमान न्यास (ट्रस्ट) योग समिती, महिला पतंजली, युवा भारत आणि पतंजली किसान सेवा पतंजली संघटनेचे सदस्य या नियतकालिकाच्या सदस्यांचा सदस्यत्व हवे. पतंजली संस्थेचे कर्मचारी त्यांच्या योग्यता कार्डाच्या आधारे पात्र ठरणार आहेत. नागरिकांना काेणत्याही बीएसएनएलच्या कार्यालयात पतंजलीच्या कागदपत्रांसमवेत आधार कार्ड जाेडून सिमकार्ड घेता येईल.

हेही वाचा: नाद खूळा! वेश बदलून एसपीच फिरताहेत साता-याच्या रस्त्यांवर

हेही वाचा: वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; शिरगावच्या कुटुंबाला शासनाचा 'आधार'

loading image
go to top