
BSNL Diwali Sanman Offer Recharge plan
esakal
BSNL Samman Offer Recharge Plan : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आकर्षक आणि परवडणारी ‘सन्मान योजना’ सादर केली आहे. ही योजना वारंवार रिचार्जच्या त्रासातून मुक्ती देणारी आणि वर्षभर रिचार्जच्या काळजी शिवाय सेवांचा आनंद देणारी आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना खास भेट ठरेल जी अवघ्या ५ रुपयांपेक्षा कमी दैनंदिन खर्चात अनेक फायदे देते.